लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुधना प्रकल्पातील पाणीनदीपात्रात सोडून या भागातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी आ़ विजय भांबळे, आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़सेलू तालुक्यामध्ये अनेक गावांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ या पार्श्वभूमीवर आ़ विजय भांबळे, आ़ बाबाजानी दुर्राणी, जि़प़चे सभापती अशोक काकडे यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांची भेट घेतली़ सेलू तालुक्यात अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या विहिरी दूधना नदीपात्रात आहेत़ मात्र दुधनेचे पात्र कोरडे पडल्यामुळे या गावांवर टंचाईचे संकट निर्माण झाले आहे़ दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडले तर ब्रह्मवाकडी, खादगाव, मोरेगाव, खेर्डा, गोमेवाकडी, शिराळा, पिंप्री घोडके, पिंप्री वाघ, खुपसा, डिग्रस बरसाले, काजळी रोहिण, राजेवाडी, राजा, कवडधन या गावांसह सेलू शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो़ तेव्हा नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे़या प्रसंगी अजय डासाळकर, नबाजीराव खेडेकर, तुकाराम मगर, महादेव भांबट, प्रदीपराव कदम, मनोज राऊत, गणेश बरसाले, प्रकाश काळे, विष्णू खंडागळे, प्रकाशराव मगर आदी उपस्थित होते़
परभणी : ‘दुधना’चे पाणी नदीपात्रात सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 12:51 AM