शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

परभणी: सव्वा लाख कुटुंबांची यादी झाली अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:01 AM

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २३ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ३० हजार ५२ पात्र शेतकरी कुटुंबाची यादी केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २३ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ३० हजार ५२ पात्र शेतकरी कुटुंबाची यादी केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.जिल्ह्यात शेतकºयांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर वार्षिक ६ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने १ फेबु्रुवारी रोजी घेतला. शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळावे व आर्थिक मदत म्हणून अर्थसंकल्पात ही घोषणा केली आहे. २ हेक्टरपर्यंत जमीन असणाºया शेतकºयांच्या बँक खात्यात ३ टप्यात ६ हजार रुपये जमा केले जाणार आहेत. याचा पहिला हप्ता मार्च महिन्यात दुसºया आठवड्यात जमा केला जाणार आहे. दुसरा हप्ता एप्रिल व तिसरा हप्ता जूनमध्ये दिला जाणार आहे. जिल्ह्यात ही योजना राबविण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक यांच्या गावनिहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ८४८ गावे असून ४ लाख ४८ हजार २०१ एवढी शेतकºयांची संख्या आहे. आतापर्यंत ८३४ गावांतील शेतकºयांची माहिती संकलित करण्यात आली आहे. यामध्ये २३ फेब्रुवारीपर्यंत परिपूर्ण प्रस्ताव आलेल्या शेतकºयांची १ लाख ७१ हजार ४७ एवढी संख्या आहे. त्यापैकी ७८८ गावांतील १ लाख ३० हजार ५२ पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे.१२८१ कुटुंबे योजनेपासून वंचित४देवगाफाटा-पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत ५ एकरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांना वार्षिक ६ हजार रुपयांची मदत केली जाणार आहे; परंतु, यासाठी जाचक अटी असल्याने देवगाफाटा सज्जांतर्गत येणाºया २०९३ कुटुंबांपैकी केवळ ८१२ कुटुंबातील व्यक्तींनाचा या योजनेचा लाभ मिळणार आहे. परिणामी १२८१ कुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. अर्थमंत्री पियूष गोयल यांनी अर्थसंकल्पात प्रधानमंत्री सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत देवगावफाटा सज्जाचे तलाठी एन.आर. सोडगीर यांनी या सज्जांतर्गत देवगावफाटा, नांदगाव, बोरकिनी, नरसापूर येथील शेतकºयांना माहिती दिली. यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे शेतकरी बांधवांकडून घेऊन शासकीय संकेतस्थळावर अपलोड केली आहेत. या माहितीप्रमाणे देवगावफाटा येथील ५५९ कुटुंबांपैकी २६५, नांदगाव येथील २५० पैकी १६० कुटुंब, बोरकिनी येथील ८३४ पैकी २५१ कुटुंब तर नरसापूर येथील ४५० पैकी १३६ कुटुंबातील व्यक्तीचा या योजनेचा मिळविण्यासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे देवगावफाटा सज्जांतर्गत येणाºया २०९३ कुटुंबांपैकी केवळ ८१२ कुटुंबातीलच सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शासनाच्या अटी व निकषाच्या अडथळ्यामुळे देवगाफाटा महसुल मंडळातील १२८१ कुटुंब या योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शेतकºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी