लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : इतर सर्व कर रद्द करुन एकच वस्तु आणि सेवाकर लागू झाल्यानंतर या कराच्या नावाखाली व्यापाºयांकडून ग्राहकांची लूट होत असल्याचे मत परभणी शहरातील नागरिकांनी सर्वेक्षणात व्यक्त केले आहे.देशातील कर प्रणालीमध्ये सुसुत्रता आणण्याच्या उद्देशाने पूर्वीचे सर्व कर रद्द करुन देशभरात वस्तु आणि सेवाकर लागू करण्यात आला. १ जुलै २०१७ पासून या कराची अंमलबजावणी सुरु झाली असून कराच्या नावाखाली लूट होत असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले आहे. या कराच्या अनुषंगाने परभणीत सर्वेक्षण करण्यात आले. जीएसटी कराच्या नावाखाली वाढीव दर आकारुन लूट होत आहे का, या प्रश्नावर ९२ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले आहे. ६ टक्के नागरिकांनी नाही असे उत्तर दिले तर २ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले. जीएसटीच्या नावाखाली वस्तूंच्या किमतीवर वाढीव दर आकारला जातो. तेव्हा आपण व्यापाºयांकडे बिलाची मागणी करता का, असा प्रश्न विचारल्यानंतर ९० टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले. ८ टक्के नागरिकांनी नाही असे उत्तर दिले तर २ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले. बिलाची मागणी केल्यानंतर ग्राहकांना ही बिले दिली जातात का? या प्रश्नावर ९० टक्के नागरिकांनी नाही, असे उत्तर दिले आहे. ४ टक्के नागरिकांनी बिले दिली जातात, असे उत्तर दिले. तर ६ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले. जीएसटीपेक्षा पूर्वीचीच कर प्रणाली बरी होती का? या प्रश्नावर ७२ टक्के नागरिकांनी होय असले उत्तर दिले. १६ टक्के नाही असे उत्तर दिले तर १२ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले. इतर सर्व कर रद्द करुन जीएसटी लागू केल्याने वस्तुच्या किंमती कमी झाल्या का? या प्रश्नावर ८६ टक्के नागरिकांनी नाही, असे उत्तर दिले तर १० टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले. तर ४ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले.
परभणी : कराच्या नावाखाली ग्राहकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:46 AM