लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील उखळद येथे २ दिवस झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे उखळद व परिसरातील २ हजार एकरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी उसनवारी व बँकांच्या दारात उभे राहून मिळालेल्या पैशातून खरीप हंगामातील पेरणी केली होती. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे परभणी तालुक्यातील उखळद व परिसरात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला.गतवर्षीचा दुष्काळ बाजूला सारून शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. जून व आॅक्टोबर महिन्याच्या कालावधीत कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर सोयाबीन पीक चांगले बहरले. मात्र १९ व २० आॅक्टोबर रोजी उखळद व परिसरात झालेल्या परतीच्या पावसामुळे जवळपास २ हजार एकरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व विमा कंपनीकडून १०० टक्के नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.ग्रा.पं.चे निवेदन४नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची भरपाई द्यावी, अशी मागणी उखळद ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाºयांकडे २२ आॅक्टोबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर तौफिक बाशामियॉ पट्टेदार, विश्वनाथ तिखे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
परभणी :दोन हजार हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:42 PM