लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठेत कापसाचे भाव कमी अधिक होत असल्याने तालुक्यातील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.यावर्षी खरीप हंगामात तालुक्यातील २२ हजार २२८ हेक्टरवर कापसाची पेरणी झाली होती. गतवर्षी पेक्षा २ हजार हेक्टर जास्त कापसाची लागवड झाली. पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने कृपा केल्याने शेतकरी समाधानी होते. कापसाचे उत्पादन वाढेल, असे वाटत असताना पावसाने दीड महिना खंड दिल्याने शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरले गेले.कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली. तसेच रासायनिक खताच्या व कीटकनाशकाच्या वाढलेल्या किंमतीमुुळे त्याचबरोबर कापूस वेचणीच्या वाढत्या मजुरीमुळे शेतकरी आजच्या भावात कापूस विकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत बाजार समितीच्या यार्डात म्हणावी तशी कापसाची आवक होत नसल्याचे चित्र आहे. अधिक माहिती घेतली असता कापसाचे भाव कमी, अधिक होत असल्याचा परिणाम यार्डातील कापसाच्या आवकवर होत असल्याचे दिसून येत आहे.आगामी काळात भाव वाढल्यानंतर कापूस विक्री करण्यावर बहुतांश शेतकरी ठाम असले तरी ज्या शेतकºयांना चार ते पाच क्विंटल कापूस झाला आहे, असेच शेतकरी पैशाच्या चणचणीमुळे भाव वाढीची वाट न बघता आपला कापूस विक्री करून मोकळे होत आहेत.दरवाढीच्या : आशेने कापूस घरातआगामी काळात कापसाला चांगला दर मिळेल, या आशेने बहुतांश शेतकºयांनी कापूस विक्रीकडे पाठ फिरविली आहे. सुुरुवातीच्या काळात कापसाचा दर ६ हजारांपर्यंत गेला होता. मात्र आता तो ५७०० पर्यंत घसरला आहे. घसरलेले सरकीचे दर यामुळे भावात चढ-उतार होत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र भावात चढ-उतार होत असल्याने कापूस उत्पादक शेतकºयांना चिंता लागली आहे.वेचणीसाठी मजूर मिळेनाकापूस वेचणीला दिवाळीच्या अगोदर सुरुवात झाली आहे. दुष्काळामुळे कामाच्या शोधात अनेकांनी शहराकडे धाव घेतल्याने मजूर मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. जे मजूर उपलब्ध आहेत, ते कापूस वेचणीसाठी प्रती किलो ८ ते १० रुपये दर मागत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडला आहे.असे राहिले मागील आठवड्यातील दरमानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्र्केट यार्डात मागील आठवडाभरात कापसाच्या भावात चढ-उतार पहावयास मिळाला. यामध्ये २१ नोव्हेंबर रोजी ५७०१ रुपये, २२ रोजी ५७५८, २३ रोजी ५७७४, २४ रोजी ५७६१, २६ रोजी ५७११, २७ रोजी ५६५२ तर २८ नोव्हेंबर रोजी ५६९१ रुपयांचा भाव मिळाला.बाजार समितीच्या यार्डात २६ नोव्हेंबरपर्यंत जाहीर लिलावाद्वारे ५९ हजार ६५२ क्विटंल शेतकºयांनी कापसाची विक्री केली आहे.-शिवनारायण सारडा, प्रभारी सचिव कृऊबागठाण, सरकीच्या भावात चढ-उतार होत असल्याने याचा परिणाम म्हणून कापसाचे भाव कमी जास्त होत असल्याची माहिती मिळत आहे.-गंगाधरराव कदम, सभापती, बाजार समिती
परभणी : कापसाच्या अस्थिर दराने उत्पादक अस्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:46 AM