लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मंगळवारी जिल्हाभरात धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा केला जात असून, या सणाच्या निमित्ताने परभणी शहरातील बाजारपेठ सजली आहे़धुलीवंदन हा सण बच्चेकंपनींपासून ते थोरा-मोठ्यापर्यंत सर्वांचाच उत्साह वाढविणारा सण आहे़ धकाधकीच्या जीवनात जराशी उसंत घेण्याच्या हेतुने हा सण ऊर्जादायी ठरतो़ एकमेकांना रंग लावून धुलीवंदन खेळण्याची प्रथा आहे़ मंगळवारी जिल्हाभरात धुलीवंदनाचा सण साजरा केला जाणार असून, त्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत विविध रंग, वेगवेगळ्या पिचकाऱ्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत़ येथील शिवाजी चौक, गुजरी बाजार, क्रांती चौक, देशमुख हॉटेल, विद्यापीठ गेट आणि परिसरात रंग विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत़ रंगांच्या किंमतीही मागील वर्षीच्या तुलनेत स्थिर आहेत़यावर्षीचे वैशिष्ट्ये म्हणजे ओल्या रंगापेक्षा सुका रंग बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्रीला आला आहे़ पिचकाऱ्यांचेही विविध प्रकार उपलब्ध आहेत़लहान मुलांमध्ये पिचकाºयांचे आकर्षण असते़ या उद्देशाने विविध कॉर्टून्सच्या पिचकाºयाही बाजारपेठेत दाखल झाल्या असून, रंग खेळण्यासाठीचे फुगे विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ शहरात सुमारे १०० ते १५० व्यापाºयांनी रंग विक्रीचे स्टॉल्स थाटले आहेत़ रविवारी या स्टॅल्सवर ग्राहकांची गर्दी दिसून आली़ सोमवारी होळीचा सण असून, याच दिवशी रंगांची विक्री वाढण्याची शक्यता आहे़
परभणी : रंगोत्सवासाठी बाजारपेठ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 10:48 PM