लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी उपलब्ध झालेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी मे महिना उजाडणार असल्याचे जिल्हा बँकेने दिलेल्या तारखांवरून स्पष्ट होत आहे़गतवर्षीच्या आॅक्टोबर महिन्यात गंगाखेड तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले़ विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेचा घोळ सुरू असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजारांचे अनुदान जाहीर केले होते़गंगाखेड तालुक्याला तीन टप्प्यात अनुदान प्राप्त झाले़ मात्र येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने आणि राष्ट्रीयकृत बँकेतून चलन पुरवठा होत नसल्याने अतिवृष्टीचे अनुदान वाटप संथ गतीने सुरू आहे़ परिणामी शेतकºयांसमोर अडचणी वाढल्या आहेत़ येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महसूल प्रशासनाकडून प्राप्त झालेले अनुदान बँकांच्या तारखांमध्ये अडकून पडल्याचे दिसत आहे़तालुक्यातील बडवणी, बनपिंपळा, ढवळकेवाडी, धारखेड, दगडवाडी, गोपा, गोदावरी तांडा, इसाद, जवळा रुमणा, कोद्री, कौडगाव, कासारवाडी, कातकरवाडी, खादगाव, खोकलेवाडी, खळी, लिंबेवाडी तांडा, माखणी, मरडसगाव, मरगीळवाडी, मुळी, नरळद, पांढरगाव, पिंप्री झोला, सायाळा, सुनेगाव, शिवाजी नगर, सिरसम, सुरळवाडी, सेलमोहा, तांदूळवाडी, उंडेगाव, उमलानाईक तांडा व झोला पिंप्री या ३५ गावांतील शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान बँकेत पडून आहे़ या गावातील शेतकºयांना अनुदान वाटप करण्यासाठी ९ जानेवारीपासून सुरुवात झाली़प्रारंभी बडवणी गावातील शेतकºयांपासून अनुदान वाटप केले जात असून, सर्वात शेवटी झोला पिंप्री गावातील शेतकºयांना अनुदान मिळणार आहे़ या शेतकºयांना आता मे महिन्याच्या १५ तारेखपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे जिल्हा बँकेने लावलेल्या तारीखनिहाय अनुदान वाटपाच्या यादीवरून स्पष्ट होत आहे़अनुदान जमा करण्याची मागणी४अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकºयांना अनुदान प्राप्त होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला़ तरीही अनुदानाची रक्कम बँकेकडे पडून आहे़ बँकेने अनुदान वाटप करण्यासाठी दिलेल्या तारखेवरून आणखी चार महिने वाट पाहण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे़४शेतकºयांच्या अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम तात्काळ खात्यावर जमा करावी, अशी मागणी उमला नाईक तांडा व पडेगाव शिवारातील नागनाथ निरस, धनंजय पवार, सुदाम निरस, सुभाष झोले, माऊली वरकडे, सचिन निरस, नाथराव मुंडे, दत्तराव शिंदे, कैलास निरस, वाल्मिक दगडे, गोपाळराव निरस, केशव बोबडे, गोविंद निरस, हनुमंत कुलकर्णी, पंडित करवर, संजय वरकडे, वंदना निरस, रमेश पंचांगे आदींनी केली आहे़चलन पुरवठा होत नसल्याने अडचण४जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चलन पुरवठा करणाºया राष्ट्रीयकृत बँकेने दोन वर्षापूर्वी झालेल्या नोटबंदीपासून जिल्हा बँकेला चलन पुरवठा करणे बंद केले आहे़४त्यामुळे या बँकेत चलन तुटवडा निर्माण झाला आहे़ परभणी येथील मुख्य शाखेतून होत असलेला चलन पुरवठा तसेच सहकारी बँकेतून मिळालेल्या चलनावर बँकेचे व्यवहार चालत असल्याचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक एच़बी़ कदम यांनी सांगितले़
परभणी : अनुदान वाटपाला उजाडणार मे महिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:03 AM