लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आरक्षण अंमलबजावणीस होत असलेल्या चालढकलीच्या निषेषधार्थ ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा ठराव रविवारी परभणी शहरातील धाररोडवरील खंडोबा मंदिरात पार पडलेल्या धनगर समाजाच्या महाबैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला़या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हरकळ हे होते़ तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते कठाळू मामा शेळके, बबनआण्णा मुळे, सुरेश भुमरे, आनंद बनसोडे, सखाराम बोबडे, गंगासागर वाळवंटे, बलभीम माथेले, प्रभाकर जगाडे, राजेश बालटकर, मंगेश घोरपडे, माऊली घोरपडे, सुरेश चांदणे, रविकांत हरकळ, विष्णू कोरडे, देविदास शिंपले, मुंजाभाऊ लांडे, राजू मुलगीर यांची उपस्थिती होती़ या बैठकीत जिल्ह्यातील समाजबांधवांच्या वतीने ३१ आॅगस्ट रोजी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा ठराव घेण्यात आला़या बैठकीस जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़
परभणी : धनगर समाजाची आरक्षणासंदर्भात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:48 PM