शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

परभणी : शेतकरी कुटुंबातील सदस्यही योजनेस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:23 AM

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये आतापर्यंत केवळ ज्या शेतकऱ्याच्या नावावर सातबारा आहे. त्या शेतकºयाला शेती व्यवसाय करताना झालेल्या अपघातात मदत देण्यात येत होती; परंतु, कृषी व पशू संवर्धन विभागाने ३१ आॅगस्ट रोजी काढलेल्या एका शासन निर्णयानुसार खातेदार शेतकरी व त्याच्या कुटुंबातील एका सदस्यास या योजनेतून आता लाभ दिला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये आतापर्यंत केवळ ज्या शेतकऱ्याच्या नावावर सातबारा आहे. त्या शेतकºयाला शेती व्यवसाय करताना झालेल्या अपघातात मदत देण्यात येत होती; परंतु, कृषी व पशू संवर्धन विभागाने ३१ आॅगस्ट रोजी काढलेल्या एका शासन निर्णयानुसार खातेदार शेतकरी व त्याच्या कुटुंबातील एका सदस्यास या योजनेतून आता लाभ दिला जाणार आहे.परभणी जिल्ह्यातील जवळपास ६ लाख शेतकरी शेती व्यवसाय करतात. शेती करीत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खरीप व रब्बी हंगामात पिकांची काळजी घेण्यासाठी रात्री-अपरात्री शेतामध्ये राबावे लागते. शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, संर्प दंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकºयांना आपला जीव गमवावा लागतो. त्याच बरोबर रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात किंवा अन्य कारणामुळे शेतकºयांना अपघाताला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्या शेतकºयाचे कुटुंब उघड्यावर येते. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबाचे आर्थिक स्त्रोत बंद होऊन अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अपघातग्रस्त शेतकºयास व त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून अपघात होऊन जीव गमावलेल्या शेतकºयांना २ लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येते; परंतु, या अगोदर शासनाच्या या योजनेतून ज्या शेतकºयांच्या नावावर सातबारा आहे, त्याच शेतकºयाला मदत देण्यात येत होती; परंतु, शेतकºयाच्या कुटुंबातील सदस्याला शेती काम करीत असताना जीव गमवावा लागला तर त्याला मदत मिळत नव्हती. त्यामुळे शेतकºयांसह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. शेतकºयांच्या या मागणीचा विचार करुन राज्य शासनाच्या कृषी, पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने ३१ आॅगस्ट २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अव्वर सचिव निता शिंदे यांच्या स्वाक्षरीने एक शासन निर्णय काढण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विहित खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील १० ते ७५ वयोगटातील एका सदस्यास शेती व्यवसाय करीत असताना मृत्यू ओढावल्यास या योजनेंतर्गत २ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.तीन वर्षात : १५७ प्रस्ताव सादर, ७५ प्रस्तावांनाच मिळाली मंजुरी४गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत २०१६ ते २०१९ या तीन वर्षात जिल्हाभरातून १५७ प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करण्यात आले होते. त्यापैकी कृषी विभागाने ७५ प्रस्ताव मंजूर केले आहेत. १४ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. यातील काही शेतकºयांना कृषी विभागाने मदतही दिली आहे.४त्यामुळे शेतकºयाच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्यांची उपजिविका भागविण्यासाठी मदत झाली आहे. त्यामुळे कृषी विभागानेही सादर झालेल्या प्रस्तावावरही तात्काळ कार्यवाही करुन शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.यावर्षीचे ११ प्रस्ताव मंजुरी अभावी पडून४शेती व्यवसाय करताना शेतकºयांना सर्प दंश, विंचू दंश, वीज पडणे, विजेचा शॉक बसणे आदी कारणास्तव जीव गमवावा लागल्यास कृषी विभागाकडून गोपीनाथ मुंडे विमा योजनेंतर्गत मदत केली जाते.४यावर्षी ७ आॅगस्टपर्यंत पालम कृषी कार्यालयाकडे १, पूर्णा तालुका कृषी कार्यालयाकडे ४, गंगाखेड ४, पाथरी १, सेलू १, जिंतूर अशा ६ तालुका कृषी कार्यालयाकडे ११ प्रस्ताव दाखल झाले आहेत; परंतु, अद्यापही हे प्रस्ताव मंजुरीअभावी त्या त्या कृषी कार्यालयाकडे पडून आहेत.४ याकडे तालुका कृषी अधिकाºयांनी लक्ष देऊन हे प्रस्ताव मंजूर करुन तातडीने शेतकºयांना मदत करावी, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी