शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

परभणी : येलदरीसह निम्न दुधनाही मृतसाठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:32 AM

जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठले असून, येलदरी पाठोपाठ आता निम्न दुधना प्रकल्पही मृतसाठ्यात गेल्याने टंचाईमध्ये भर पडण्याची भीती निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठले असून, येलदरी पाठोपाठ आता निम्न दुधना प्रकल्पही मृतसाठ्यात गेल्याने टंचाईमध्ये भर पडण्याची भीती निर्माण झाली आहे़जिल्ह्यातील शहरी भागांना पाणीपुरवठा करण्याची भिस्त येलदरी आणि निम्न दुधना या प्रमुख प्रकल्पांवर आहे़ मात्र मागील तीन वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा होत असल्याने प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा जमा होत नाही़ परिणामी, पाणीटंचाईचे संकट गंभीर होत आहे़ मागील वर्षी येलदरी प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने परभणी, पूर्णा शहराला निम्न दुधना प्रकल्पातून पाणी घ्यावे लागले़ यावर्षीच्या उन्हाळ्यातही निम्न दुधना प्रकल्पामध्ये परभणी, पूर्णा शहरासाठी पाणीसाठा राखीव ठेवला होता़ येलदरी प्रकल्पात पाणी नसल्याने निम्न दुधनातून पाणी घेण्यात आले़ परंतु, निम्न दुधना प्रकल्पानेही तळ गाठला आहे़ ३४४़८०० दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पाचा मृतसाठा १०२ दलघमी क्षमतेचा आहे़ तर जिवंत पाणीसाठा २४२ दलघमी क्षमतेचा आहे़ सद्यस्थितीला उपलब्ध माहितीनुसार निम्न दुधना प्रकल्पामध्ये जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही़ या प्रकल्पात १०२ दलघमी एकूण पाणीसाठा शिल्लक असून, हा सर्वसाठा मृतसाठ्यातील आहे़ गतवर्षी याच प्रकल्पात ५३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता़ मात्र यावर्षी ० टक्के पाणीसाठा राहिल्याने आगामी काळातील टंचाईचे संकट आणखीच गडद झाले आहे़ येलदरी प्रकल्पात यापूर्वीच जिवंत पाणीसाठा संपला असून, आता दोन्ही प्रकल्पांमध्ये जिवंत पाणीसाठा उपलब्ध नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे़केवळ ११ दलघमी पाणी उपलब्ध४जिल्ह्यातील कोरड्या प्रकल्पांची संख्या दररोज वाढत चालली आहे़ पाणीसाठा नसल्याने टंचाईची परिस्थिती गंभीर स्वरुप धारण करीत आहे़ परभणी जिल्ह्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये २़२१९ दलघमी, मानवत तालुक्यातील झरी प्रकल्पात १़४०४ दलघमी, जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पात २़८५४ दलघमी आणि डिग्रस बंधाऱ्याध्ये ४़६६० दलघमी असा एकूण ११़१३७ दलघमी पाणीसाठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे़ परभणी, पूर्णा या मोठ्या शहरांना दोन महिन्यांना २ दलघमी पाणीसाठा लागतो़ तसेच इतर शहरांनाही पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची आवश्यकता भासणार आहे़ प्रत्यक्षात प्रकल्पात पाणी नसल्याने आगामी काळात पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे़सहा प्रकल्प कोरडेठाक४जिल्ह्यातील येलदरी, निम्न दुधना या प्रमुख प्रकल्पांबरोबरच इतर चार प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे़४गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात पाणीसाठा शिल्लक नसून गोदावरी नदीवर बांधलेला मुदगल, ढालेगाव आणि मुळी बंधारा कोरडाठाक पडला आहे़४डिग्रस बंधाºयामध्ये केवळ ४़५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे़ तर जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पात २़८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी