लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी ): सेलू ते परभणी दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणारी मिनी बस उलटून क्लिनर जागीच ठार झाला तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत़ हा अपघात रविवारी सेलू ते मानवत या राज्य रस्त्यावर निपाणी टाकळी ते ढेंगळी पिंपळगाव दरम्यान १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३़३० वाजेच्या सुमारास घडला़सेलूहून प्रवासी घेवून भरधाव वेगाने परभणीकडे जात असलेली मिनी बसवरील (क्रमांक एमएच २२ एन-४३३७) चालकाचे नियंत्रण सुटल्याने निपाणी टाकळी पाटीसमोर बस रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन उलटली़ यात क्लिनर सय्यद नवाब (३५) हा बसखाली दबून जागीच ठार झाला़ तर बसमधील प्रवासी जनाबाई अभिमान पंडागळे (६०, रा़ ढेंगळी पिंपळगाव ता़ सेलू), सुमन बन्सी दवंडे (४५, रा़ जालना) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत़ जखमी महिला प्रवाशांना उपचारासाठी परभणी येथे दाखल करण्यात आले आहे़ या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात नोंद घेऊन पुढील प्रक्रियेचे काम सुरू होते़ दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली़ मात्र क्लिनर बसखाली दबलेला असल्याने मिनी बसच्या मालकाने जेसीबीच्या सहाय्याने बस उभी करून ठेवली़ या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन अपघाताची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, उशिरापर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती.भंगार मिनी बसमधून जीवघेणा प्रवास४सेलू ते परभणी या मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक भंगार अवस्थेतील मिनी बस धावतात़ या भंगार मिनीबस स्थानकाच्या समोर असलेल्या मुख्य रस्त्यावर लावल्या जातात़ तसेच रस्त्यावर उभ्या करून प्रवासी भरले जातात़ कालबाह्य आणि भंगार झालेल्या मिनी बसचा प्रवास जीवघेणा ठरत आहे़ वाहतूक पोलीस मात्र ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत आहेत.
परभणी : मिनी बसला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:01 AM