लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे गेल्या तीन दिवसांपासून रिमझिम पावसामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर पायी चालणे कठीण झाले आहे.जिंतूर तालुक्यातील कौसडी हे गाव मोठे असून गावाची लोकसंख्या जवळपास १५ हजारावर आहे. गावात अनेक अंतर्गत रस्ते असून या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गावातील जीवने गल्ली, बहिरट गल्ली, प्रबोध नगर या भागात ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याची दयनीय अवस्था कायम आहे.ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून गावातला विविध विकास करण्यासाठी लाखो रुपये निधी मंजूर असून सुद्धा ग्रामपंचायतीने या रस्त्याच्या कामासाठी या निधीचा वापर न केल्यास दयनीय अवस्था झाली आहे.त्यामुळे ग्रामस्थांना समस्येला तोंड देण्याची वेळ आली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वीज गूल होण्याचे प्रकार वारंवार वाढले आहे, अशा परिस्थितीत कौसडीवासियांना घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे.आरोग्याचा धोका४रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या नाल्या तुंबल्यामुळे सर्वत्र पाणी रस्त्यावर वाहत आहे. या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.४वेळोवेळी ग्रामपंचायतीला रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करूनही ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे. याकडे लक्ष देऊन गावातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
परभणी : कौसडी गावातील अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:59 PM