लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मोबाईल चोरीसह इतर चोरीच्या प्रकरणांमध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २५ आॅगस्ट रोजी दोन आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ६ लाख १ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.शहरात जिंतूर रोडवरील सिटी फंक्शन हॉल परिसरात काही जण चोरीचे मोबाईल कमी किंमतीत विकत असल्याची माहिती मिळल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी खातरजमा करण्यासाठी एका पथकास जिंतूर रोड परिसरात पाठविले होते. माहितीची सत्यता पडताळून सापळा रचून कारवाई करण्याचे आदेशही मोरे यांनी दिले होते. त्यानुसार या पथकाने सापळा लावला. त्यात इश्तिया खॉँ अल्ताफ खान (२२, रा.मालेगाव, जि.नाशिक) आणि महंमद अली अब्दुल जब्बार (१९, रा.मालेगाव, जि.नाशिक) या दोघांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष दोघांचीही झडती घेतली तेव्हा त्यांच्या ताब्यातून एक महिंद्रा कंपनीची चार चाकी गाडी तसेच विविध कंपन्यांचे ११ मोबाईल हँडसेट पथकाने जप्त केले. हे मोबाईल परभणी येथील रेल्वेस्थानक, बसस्थानक व इतर ठिकाणाहून चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे आरोपींनी या चोरीसाठी चारचाकी गाडीचाही वापर केला. ती पोलिसांनी जप्त केली.या प्रकरणात ६ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही आरोपींवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा आर, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, हनुमंत जक्केवाड, सुग्रीव केंद्रे, शिवदास धुळगुंडे, किशोर चव्हाण, हरिश्चंद्र खुपसे, जमीर फारोखी शंकर, गायकवाड, अरुण कांबळे यांनी कली.
परभणी : मोबाईल चोरट्यांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:47 PM