लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी जिल्ह्यात मतदान होत असून, अधिकारी, कर्मचारी साहित्यासह मतदान केंद्रांवर दाखल झाले आहेत़ गुरुवारी सकाळी ६ वाजता मॉक पोलने मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे़जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे़ एकूण २ हजार १७४ मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होणार आहे़ या मतदानापूर्वी सकाळी ६ वाजता प्रत्येक मतदान केंद्रावर मॉक पोल करून घेतले जाणार आहे़ विशेष म्हणजे या मॉक पोलसाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे़प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान यंत्रावर प्रात्यक्षिक स्वरुपात ५० मतदान केले जाणार आहे़ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हे प्रात्यक्षिक मतदान होणार असून, त्यानंतर मतदान यंत्रातील सर्व डाटा डिलीट करून हे यंत्र सील केले जाणार आहे़ तसेच व्हीव्हीपॅटमध्ये निघालेल्या चिठ्ठ्या मतदान प्रतिनिधींच्या समक्ष सील केल्या जाणार आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली़ त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविषयी असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न निवडणूक विभागाच्या वतीने केला जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ होईल़अधिकाऱ्यांच्या वाहनातच राखीव मतदान यंत्रमतदान प्रक्रिये दरम्यान, तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने २० टक्के मतदान यंत्र राखीव ठेवले आहे़ परभणी मतदार संघातील मतदान प्रक्रियेसाठी २ हजार १७४ केंट्रोल युनिट, ४ हजार ३४८ बॅलेट युनिट आणि २ हजार १७४ व्हीव्हीपॅट मशीन लागणार आहेत़ मशीनमध्ये बिघाड झाल्यास ती तात्काळ बदलात यावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या वाहनातच राखीव मशीन ठेवण्यात आली आहे़ त्यानुसार ४३५ व्हीव्हीपॅट, ८६९ बॅलेट युनिट आणि ४३५ कंट्रोल युनिट राखीव स्वरुपात ठेवण्यात आले आहेत़
परभणी :‘मॉक पोल’ने होणार मतदानाची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:47 AM