शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
3
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
4
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
5
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
7
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
8
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
9
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
11
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
12
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
13
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
14
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
15
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
16
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
17
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
18
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
19
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
20
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

परभणी : आरक्षणासाठी मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:44 AM

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी पाथरी, मानवत, जिंतूर येथे आठवडाभरापासून धरणे आंदोलन सुरु आहे. गुरुवारीही ही आंदोलने सुरुच ठेवण्यात आली. जिंतूरमध्ये आ.विजय भांबळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी पाथरी, मानवत, जिंतूर येथे आठवडाभरापासून धरणे आंदोलन सुरु आहे. गुरुवारीही ही आंदोलने सुरुच ठेवण्यात आली. जिंतूरमध्ये आ.विजय भांबळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यात आंदोलन केले जात आहे. पाथरी, सेलू, जिंतूर आणि मानवत या चार ठिकाणी आठवडाभरापासून धरणे आंदोलन केले जात असून गुरुवारी ग्रमाीण भागातूनही समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.मानवतमध्ये आंदोलन सुरुचमानवत येथे राज्य शासन मराठा आरक्षणासाठी जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याच्या कारणावरुन सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर २ आॅगस्ट रोजी राज्य शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी देऊन निषेध करण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.मानवत येथे गेल्या १२ दिवसांपासून तहसीलसमोर आंदोलन सुरु आहे. गुरुवारी सावळी, नागरजवळा, खडकवाडी, बोंदरवाडी गावातील ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.आरक्षण मिळेपर्यंत मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णयपाथरी- तालुक्यातील सारोळा बु. येथील मराठा समाज बांधवांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला असून २ आॅगस्ट रोजी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले नाही. या दिवशी ७२ टक्के विद्यार्थी शाळेत अनुपस्थित राहिले. सारोळा बु. येथे जिल्हा परिषदेची आठवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत ११८ विद्यार्थी शिक्षण घेतात. आंदोलन सुरु होण्यापूर्वी ११६ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. मात्र आंदोलन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ११८ पैकी केवळ ३३ विद्यार्थी शाळेत दाखल झाले.टाकळगव्हाणलाही शाळा बंदआरक्षण जाहीर होईपर्यंत मुले शाळेत पाठवायची नाहीत, असा निर्णय सारोळा बु. येथील पालकांनी घेतल्यानंतर या अनोख्या आंदोलनाचे लोण टाकळगव्हाण गावातही पोहचले आहे. गुरुवारी दुपारी १ वाजेनंतर जिल्हा परिषदेची शाळा बंद करण्यात आली. मराठा आंदोलना संदर्भात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. आंदोलने करुनही सरकार नमत नसल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.जिंतुरमध्ये आमदारांच्या घरासमोर ठिय्यामराठा आरक्षणाची मागणी विधानसभेत मांडावी व समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, यासाठी गुरुवारी आ.विजय भांबळे यांच्या घरासमोर भजने सादर करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. ठिय्या आंदोलनानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत शहरातील प्रमुख मार्गावरुन मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तहसील कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनाच्या स्थळी नेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव आणून विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी करीत आ. विजय भांबळे यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले. मात्र आ.भांबळे हे मुंबई येथे असल्याने त्यांचे वडील माजी राज्यमंत्री माणिकराव भांबळे यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करुन आम्ही समाजाच्या पाठिशी आहोत, असे सांगितले. दरम्यान, तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवकांनीही आंदोलनात सहभाग घेऊन आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. या आंदोलनात विविध गावांमधील भजनी मंडळेही सहभागी झाले होते.आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या -मोहन फडपरभणी- मराठा समाजाला आरक्षण देऊन यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी आ.मोहन फड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आ.फड यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी पाथरी मतदारसंघात मराठा समाज बांधवांकडून आंदोलन करण्यात येत आहे, त्यांची मागणी रास्त आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाºया आंदोलकांवर दाखल झालेले कठोर गुन्हे मागे घ्यावेत, असेही या निवेदनात फड यांनी म्हटले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMaratha Reservationमराठा आरक्षण