लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मॉब लिंचिंगच्या प्रकरणात राज्यभरात आंदोलने सुरू असून, शुक्रवारी परभणी येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तर पूर्णा येथे जमियत उलमा व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.देशभरात मॉबलिंचिंगचे प्रकार वाढत असल्याने बहुजन क्रांती मोर्चाने या घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. सकाळी १० वाजेपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. विविध वक्त्यांनी आपल्या भाषणांमधून या घटनांचा निषेध नोंदविला. मागील चार वर्षात देशात मॉब लिंचिंगच्या २६६ घटना घडल्या असून, झारखंड राज्यात १८ घटना आतापर्यंत घडल्या आहेत. या घटना राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप वक्त्यांनी केला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्टÑपतींना निवेदन पाठविण्यात आले. मॉब लिंचिंगच्या विरोधात कायदा करुन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, तरबेज अंसारी यांच्या पत्नीस शासकीय नोकरी देऊन कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी आदी ८ मागण्या करण्यात आल्या. या निवेदनावर लखन चव्हाण, डॉ.लंगोटे, सुभाष साळवे, आरेफ पटेल, खमिसा मो.जुनेद, स.अ. कादर, अॅड.शहनवाज, अॅड.सलाम, वहीद पटेल, इमरान खान आदींची नावे आहेत.पूर्णा येथे : तहसीलदारांना दिले निवेदनच्पूर्णा : मॉब लिंचींग प्रकरणातील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह विविध मागण्या करीत ५ जुलै रोजी जमियत उलमा व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. प्रकरणी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.च्पूर्णा येथे शुक्रवारी दुपारी जामा मशीद येथून मूक मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव जमा झाले होते. दुपारी २ वाजता निघणारा मोर्चा काही करणाने रद्द करण्यात आला. मात्र याच ठिकाणी मागण्यांचे निवेदन देण्याची भूमिका संयोजकांनी घेतली.च्त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन त्यात विविध मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या. मॉब लिंचिंग बाबत कायदा तयार करून झारखंड प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मयत तबरेज अन्सारी यांच्या पत्नीला शासकीय नोकरी व घरातील मंडळींना एक कोटी रुपये मोबदला द्यावा आदी मागण्या केल्या.च्यावेळी मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
परभणीत आंदोलन;मॉब लिंचिंग प्रकरणी नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:05 AM