शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

परभणीच्या खासदारांकडून जिंतूर रस्ता कंत्राटदाराला ५ कोटी रुपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:33 PM

परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार खा.संजय जाधव यांनी परभणी- जिंतूर रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळेच या रस्त्याचे काम रखडले असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार खा.संजय जाधव यांनी परभणी- जिंतूर रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळेच या रस्त्याचे काम रखडले असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला.परभणी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार राजेश विटेकर, आ.विजय भांबळे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, आ.रामराव वडकुते, खा. माजीद मेमन, सुरेश वरपूडकर, सुरेश देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला राठोड, भावना नखाते आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, परभणीचे खा.संजय जाधव हे जिल्ह्याच्या विकासात अडसर असून त्यांच्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. परभणी- जिंतूर रस्त्याचे काम करणाºया कंत्राटदाराला त्यांनी ५ कोटी रुपयांची मागणी केली. त्यामुळेच या रस्त्याचे काम रखडले आहे, असा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला. शिवसेना ही चिवसेना झाली असून या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना अफजलखानाची उपमा देतात आणि त्याच अफजलखानाचा फॉर्म भरण्यासाठी गुजरातला जातात. ही बाळासाहेबांची शिवसेना नसून चिवसेना झाली आहे, असा आरोपही यावेळी त्यांनी केला. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी तोडपाणी करणारे नेते म्हणून माझ्यावर आरोप केला. खर तर तोडपाणी करणारे कोण आहेत, याचा शोध घेतला पाहिजे. यासाठी माझी तुम्ही चौकशी करा, तुमच्या ुचिक्की, टीएचआर, मोबाईल घोटाळ्याची चौकशी मी करतो, असेही ते म्हणाले. यावेळी आ.भांबळे, माजीमंत्री वरपूडकर, माजी आ. देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. विनोद राठोड यांनी केले.पुरावे द्या, राजकारणातून संन्यास घेतो -बंडू जाधव४आ.धनंजय मुंडे यांच्या आरोपासंदर्भात प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे उमेदवार खा.संजय जाधव म्हणाले की, परभणी- जिंतूर रस्त्याचे काम करणारा कंत्राटदार तेलंगणातील तेलगू देसमचा राज्यसभा खासदार आहे. या कंत्राटदारावर तेलंगणात सीबीआयच्या धाडी पडल्या. त्यामुळे त्याने या रस्त्याचे काम बंद केले आहे. जिंतूर येथे एका बैठकीत व्यापाऱ्यांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात आपल्याकडे तक्रार केल्यानंतर मीच या विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव यांना फोनवर बोलून या रस्त्याचे काम बंद झाल्याबद्दल त्यांना धारेवर धरले होते. त्यावेळी सदरील कंत्राटदार अडचणीत असल्याने काम बंद असल्याचे जाधव यांनी सांगितले होते. मी किंवा माझा कोणताही कार्यकर्ता या कंत्राटदाराला भेटला नाही, या रस्त्यावरील कामाच्या ठिकाणी कधीही गेलो नाही, कोणाचाही चहा पिला नाही. एखाद्यावर खोटे व बिनबुडाचे आरोप करीत असताना किमान त्याबाबतची पडताळणी तरी करुन घ्या. मी कोणाला पैसे मागितल्याचे पुरावे असतील तर द्या, राजकारणातून संन्यास घेतो आणि तुम्ही पुरावे देऊ शकत नसाल तर तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या, असा पलटवारही खा. जाधव यांनी केला. माझ्यावर वाळू ठेकेदारांशी संबंध असल्याचे आरोप करतात; परंतु, तुमचेच उमेदवार वाळू ठेकेदार आहेत, हे संपूर्ण गोदाकाठच्या गावांना विचारुन घ्या. शिवाय जिंतूर तालुक्यातील रेपा येथील कामाच्या प्रकरणात बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना कोण आणि कशासाठी मारहाण केली, याचाही शोध घ्या, असेही जाधव म्हणाले.

टॅग्स :parabhaniपरभणीSanjay Jadhavसंजय जाधवDhananjay Mundeधनंजय मुंडे