लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेत शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मनपा आयुक्त रमेश पवार, उपायुक्त भारत राठोड यांच्यासह अनेक विभागप्रमुख व कर्मचारी गैरहजर असल्याचे पहावयास मिळाले.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वर्दळही कमी झाली आहे. त्याचा पुरेपुर लाभ काही अधिकारी व कर्मचारी घेताना आढळून येत आहेत. शासकीय सुटी जोडून आल्यास प्रशासकीय कामकाजावर याचा अधिक परिणाम दिसून येत आहे. २७ एप्रिल रोजी चौथा शनिवार असल्याने व २८ रोजी रविवार असल्याने शासकीय सुटी आहे. सलग दोन सुट्या लागून आल्याने शुक्रवारी दुपारी महानगरपालिकेत प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचारीही उपस्थित नसल्याचे दिसून आले. मनपा आयुक्त रमेश पवार, उपायुक्त भारत राठोड, नगरसचिव मुकूंद रत्नपारखी, लेखापरिक्षक, मुख्य लेखा वित्त अधिकारी जाधव या प्रमुख अधिकाºयांसह अन्यही काही अधिकारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कार्यालयात दिसून आले नाहीत. त्यामुळे अनेक टेबलवर कर्मचाºयांचीही अनुपस्थिती दिसून येत होती.दुसºया मजल्यावर स्वच्छता अभियान कक्षासमोर काही कर्मचारी फॉर्मची पडताळणी करताना दिसून आले. अधिकारीच नसल्याने पदाधिकारीही कोणी उपस्थित नव्हते. परिणामी विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले. प्रमुख अधिकारी कशामुळे गैरहजर होते, हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान, महानगरपालिकेतील प्रशासकीय कामकाजात गेल्या काही महिन्यांपासून सुस्तपणा आला आहे. परिणामी नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.१७ दिवसांपासून शहराला पाणी नाहीपरभणी शहराला गेल्या १७ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. राहटी येथील बंधाºयात पाणीसाठा उपलब्ध असतानाही पाणी वितरणाचे योग्य नियोजन होत नसल्याने नागरिकांच्या घश्याला कोरड पडत आहे.परिणामी पाण्यासाठी नागरिकांची एकीकडे भटकंती वाढली असताना दुसरीकडे पाणीप्रश्न सोडविण्याची तसदी प्रशासनासह पदाधिकाºयांकडून घेतली जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
परभणी मनपा आयुक्त, उपायुक्तांसह अनेक विभागप्रमुख व कर्मचारी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:24 AM