लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेचा ६९ लाख ६५ हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती सुनील देशमुख यांनी शनिवारी आयोजित बैठकीत सादर केला़ या अर्थसंकल्पास सभागृहाने चर्चेद्वारे मंजुरी दिली़शहरातील महानगरपालिकेच्या बी़ रघुनाथ सभागृहात शनिवारी मनपाच्या अर्थसंकल्पीय विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी व्यासपीठावर सभापती सुनील देशमुख, प्रभारी आयुक्त डॉ़ विद्या गायकवाड, मुख्य लेखाधिकारी गणपत जाधव, अंतर्गत लेखा परीक्षक एम़बी़ राठोड, सहाय्यक लेखा परीक्षक मंजूर हसन, प्रभारी नगरसचिव विकास रत्नपारखे आदींची उपस्थिती होती़ यावेळी सभापती देशमुख यांनी अर्थसंकल्प सादर करीत असताना महानगरपालिकेकडे दरवर्षी विविध माध्यमातून ५३३ कोटी १९ लाख ३३ हजार ३९१ रुपये जमा होतात़ त्यापैकी ५३२ कोटी ४९ लाख ६८ हजार ५४ रुपये विविध विकास कामे व प्रशासकीय बाबींवर खर्च होतात़ उर्वरित ६९ लाख ६५ हजार ३३७ रुपये शिल्लक राहतील, अशी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले़ यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याप्रमाणे महाराणा प्रताप चौक पुतळा परिसराचे तसेच शहीद अब्दुल हमीद, वसंतराव नाईक पुतळा परिसराचे सुशोभीकरण करावे व यासाठी १० लाखांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी सदस्यांनी केली़ प्रभाग क्रमांक १ ते १६ मधील रस्ता कामांसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली़उड्डाणपूल, वसमत रोड, जिंतूर रोड या रस्त्यावर दुभाजकात पोल उभारून विद्युत दिव्यांची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित केल्याचे सभापती देशमुख यांनी सांगितले़ नगरसेवक डॉ़ विद्या पाटील यांनी जेथे पाणीटंचाई जाणवत आहे तेथे टँकर सुरू करावेत तसेच शहरातील हातपंप दुरुस्त करावेत, अशी मागणी केली़ यावेळी चर्चेत नगरसेवक बाळासाहेब बुलबुले, एस़एम़ अली पाशा, इम्रान हुसेनी, नाजनीन पठाण, प्रशास ठाकूर, अतुल सरोदे आदींनी सहभाग घेतला़असे आहेत : मनपाचे नवीन वर्षात संकल्प४नागरिकांना आॅनलाईन पद्धतीने विविध कर भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणार, यासाठी साडेपाच कोटींची तरतूद़ शहराची पाणीपुरवठा योजना सप्टेंबर २०१९ अखेरपर्यंत पूर्ण करून प्रति दिन प्रतिमाणशी १३५ लिटर (सध्या ७५ लिटर) पाणी उपलब्ध करून देणाऱ४शहरातील पथदिवे अॅटोमॅटिक पद्धतीने चालू-बंद करण्याची यंत्रणा उभारणार, यासाठी १ कोटी ७५ लाखांची तरतूद़ मनपाचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यासाठी अडीच कोटींची तरतूद, नवीन नाट्यगृहासाठी १० कोटी मिळाले आहेत़ आणखी ५ कोटींची तरतूद़
परभणी मनपाचा ७० लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:56 PM