परभणी : महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त शिवस्मारक पुतळा येथे अभिवादन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्य गीत 'गर्जा महाराष्ट्र माझा' गाऊन अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र गीताचा आवाज शिवरायांच्या पुतळा परिसरात निनादला होता.
महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त रविवारी सकाळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, जि.प.सीईओ रश्मी खांडेकर, आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, पोलीस अधीक्षक रागसुधा.आर., उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार गणेश चव्हाण, पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, उपायुक्त मनोज गग्गड, शहर अभियंता वसीम पठान, सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, शाखा अभियंता पवन देशमुख, दिनेश बंडे, भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी, दीपक कानोडे, दीपक मोराडी, मोहम्मद अथर, भारत सोळंके, युवराज साबळे, उमेश जाधव, राजकुमार जाधव, श्रीकांत कुऱ्हा, सुनील झांबरे, कुणाल भारसाखळे यांच्या उपस्थितीमध्ये शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आयुक्त सांडभोर यांच्यासह सर्व विभागप्रमुख भगवे फेटे परिधान करून उपस्थित होते.
फटाक्यांची आतषबाजी शनिवारी मध्यरात्री बारा वाजता आमदार सुरेश वरपूडकर, आ.राहुल पाटील, शाखा अभियंता पवन देशमुख, राजकुमार जाधव, दिनेश बंडे, युवराज साबळे यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. यावेळी माजी उपमहापौर भगवान वाघमारे, गणेश देशमुख, सुनील देशमुख, अतुल सरोदे, प्रवीण गोमचाळे, डॉ. विवेक नावंदर, अरविंद देशमुख, विशाल बुधवंत, ज्ञानेश्वर पवार, गजानन जोगदंड, सुभाष जावळे, नवनीत पाचपोर उपस्थित होते.