लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : एक्झिट पोलचे अंदाज व मतदारांचा वाढता कल पाहून जिंकण्याचा आत्मविश्वास उराशी बाळगणाऱ्या राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाला १७ व्या लोकसभा निवडणुकीत गुरुवारी पराभव पत्कारावा लागला.१७ व्या लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाला मतदारांचा वाढता पाठिंबा व काही एक्झिट पोलने राकॉँच्या बाजूने दिलेला कौल पाहता आपण बाजी मारणार, हा आत्मविश्वास बाळगणाºया राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे गुरुवारी सकाळी ९ वाजल्यापासून परभणी शहरातील वसमत रोडवरील राष्टÑवादी कॉँग्रेस भवनामध्ये ग्रामीण भागातून आगमन होऊ लागले. दुपारी १२ वाजेपर्यंत राष्टÑवादी भवन कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. कार्यालयाच्या समोर गाड्यांचा ताफा, त्याच बरोबर पुण्याहून मागविलेला डीजेचा ट्रक दीमाखामात पक्ष कार्यालयासमोर उभा होता; परंतु, पहिल्या फेरीपासून ते १७ व्या फेरीपर्यंत विरोधी उमेदवारांची लीड कमी होत नव्हती. त्यामुळे दुपारी १ वाजल्यापासून राकॉँ भावनात गर्दी केलेल्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली. दुपारी २ वाजेपर्यंत राकॉँ भावनात लावलेल्या टीव्ही समोर काही मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते.राष्टÑवादी भवनात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना ग्रामीण भागात विरोधी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून भ्रमणध्वनीवरून फोन येण्यास सुरुवात झाली; परंतु, शेवटच्या फेरीपर्यंत विरोधी उमेदवाराचे मताधिक्य कमी होत नव्हते. त्यामुळे दुपारी ३ वाजेच्या सुमारास राष्टÑवादी भवन पूर्णत: मोकळे झाले. कार्यालयासमोर लागलेला गाड्यांचा ताफाही एकामागून एक निघून गेला. विजयाचा आत्मविश्वास असल्याने पुण्याहूून मागविलेला डीजेही ४ वाजेच्या सुमारास परतीच्या मार्गाने निघाला. एकंदरीत सकाळच्या वेळी गर्दीने फुलून गेलेल्या राष्टÑवादी भवनात दुपारी ३.३० वाजेपासून सन्नाटा परसरला होता.ग्रामीण भागातून उत्साहाच्या भरात आलेल्या कार्यकर्त्यांना पक्ष कार्यालय शांत झालेले दिसले. त्यामुळे एकंदरीत झालेला पराभव मोठ्या मनाने स्वीकारत राकॉँ पदाधिकारी व कार्यकर्ते परतीच्या मार्गाने निघाले.कार्यकर्त्यांमध्ये नाराजीगुरुवारी सकाळी कार्यकर्ते आपला उमेदवार विजयी होणार ही खूण गाठ बांधून घराच्या बाहेर पडले. जसजसा निकाल येत होता तसतसेच कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातारण निर्माण झाले. निवडणुकीच्या काळात आपला उमेदवार विजयी व्हावा, यासाठी रात्रं-दिवस एक करीत केलेल्या मेहनतीवर गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पाणी फेरले. कित्येक वर्षाने शिवसेनेचा गड काबीज करण्यास निघालेल्या राकॉँ कार्यकर्त्यांच्या पदरी यावेळेसही अपयशच आले.
परभणी : राष्टÑवादी कॉँग्रेस कार्यालयात पसरला सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:49 AM