शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

परभणी :राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला मुहूर्त; २७ कोटींच्या निविदा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 12:51 AM

जिल्ह्यातील कोल्हापाटी ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्ग २२२ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागाला असून, या कामासाठीच्या २७ कोटी रुपयांच्या निविदांना शुक्रवारी प्रत्यक्ष मंजुरी देण्यात आली. येत्या चार दिवसांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मिठेवाड यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील कोल्हापाटी ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्ग २२२ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागाला असून, या कामासाठीच्या २७ कोटी रुपयांच्या निविदांना शुक्रवारी प्रत्यक्ष मंजुरी देण्यात आली. येत्या चार दिवसांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मिठेवाड यांनी दिली.कल्याण- नगर- परभणी-नांदेड- निर्मल या राष्ट्रीय महामार्ग २२२ चे परभणी जिल्ह्यात कोल्हा पाटीपर्यंत काम पूर्ण झाले आहे. त्यापुढे कोल्हापाटी ते नसरतपूर या रस्ता कामाच्या २८१ कोटी ७८ लाख रुपयांच्या निविदेला १ आॅगस्ट २०१६ रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. हे काम मुंबई येथील मे. गॅनॉन डॅनकरले या कंपनीला देण्यात आले होते. त्यानंतर २० डिसेंबर २०१६ रोजी या कामाबाबत संबंधित कंपनीसोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने करार केला होता. त्यानंतर २८ जून २०१७, २८ नोव्हेंबर २०१७, ९ डिसेंबर २०१७, ११ डिसेंबर २०१७ असा वारंवार कंपनीसोबत विविध कारणांनी पत्र व्यवहार करण्यात आला; परंतु, प्रत्यक्ष या रस्ताकामाला सुरुवातच झाली नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिठेवाड यांनी पुन्हा सदरील कंपनीला १३ डिसेंबर २०१७ रोजी काम समाप्त करण्याची नोटीस बजावली. या संदर्भात १५ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले होते; परंतु, त्यालाही या कंपनीने दाद दिलेली नाही. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर १९ एप्रिल २०१८ रोजी परभणी येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रस्ता कामाचे ई-भूमिपूजनही करण्यात आले होते. तरीही या कंपनीने या कामाला प्रारंभ केला नाही. दुसरीकडे या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात ओरड होऊ लागली. त्यानंतर आ. बाबाजानी दुर्राणी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. तसेच बांधकाम विभाग सदरील कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरणने सदरील रस्त्याचे काम मुंबईतील कंत्राटदाराकडून पूर्ण करुन घेण्याऐवजी तात्पुरत्या स्वरुपात निविदा मागवून काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात माहिती देताना या विभागाचे कार्यकारी अभियंता मिठेवाड म्हणाले की, कोल्हापाटी ते झिरोफाटा (परभणी शहर परिसर वगळून) या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी ७० लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. शुक्रवारी ही निविदा उघडण्यात आली. त्यानुसार कंत्राटदारामार्फत खड्डे बुजविण्याचे काम येत्या चार दिवसांमध्ये सुरु होणार आहे. परभणी शहर व परिसरातील १४ कि.मी. रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामासाठी २६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या कामाच्या निविदांचीही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या कामालाही येत्या चार दिवसांत सुरुवात होईल, असे मिठेवाड म्हणाले.कामाच्या दर्जाकडे लक्ष देण्याची गरजकोल्हापाटी ते झिरोफाटा या परभणी शहर परिसर वगळता असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले असले तरी संबंधित काम हे दर्जेदार व्हावे, याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय परभणी शहर परिसरातील १४ कि.मी.अंतराच्या कामासाठी तब्बल २६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हे काम परभणी जिल्ह्यातीलच कंत्राटदाराला देण्यात आले आहे. परभणीतील काही कंत्राटदारांना समाधानकारक काम केले नसल्याने महानगरपालिकेने काळ्या यादीत टाकले होते. हा अनुभव पाहता या कामावर प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष ठेवण्याची देण्याची गरज आहे. शिवाय या कामाची वेळोवेळी गुणवत्ता निरिक्षण विभागाकडून तपासणी होणे आवश्यक आहे, असे जिल्हावासियांचे मत आहे.

 

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्गfundsनिधी