लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे (ओबीसी) आरक्षण पूर्ववत ठेवण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने ५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसीची ५२ टक्क्यांपेक्षा अधिक संख्या आहे़ त्यांना २७ टक्के आरक्षण दिलेले आहे़ परंतु, शासनाने नुकताच ३१ जुलै रोजी अध्यादेश काढून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग मिळून तयार होणाऱ्या नागरिकांच्या प्रवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणात कपात केली आहे़या अध्यादेशाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ त्यानंतर जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांना निवेदन देण्यात आले़या आंदोलनात ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा़ किरण सोनटक्के, संतोष देशमुख, कृष्णा कटारे, अभय कच्छवे, दत्तराव मायंदळे, तुकाराम गोंगे, लालदास पवार, श्यामराव देवकते, प्रभू जाधव, सुरेश लटपटे, सुमंत वाघ, सिद्धांत हाके, शांतीस्वरुप जाधव, किरण तळेकर, मनोज राऊत, दीपक वारकरी, महादेव चव्हाण, मीनाताई राऊत, कमलताई राठोड, नंदाताई राठोड, रेखाताई आपटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते़
परभणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:20 AM