लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राहटी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपत आला असून, शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू नये, या उद्देशाने महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांकडे एक दलघमी पाण्याची मागणी नोंदविली आहे़ शहराला हे पाणी कसे आणि कोठून द्यायचे याबाबत जिल्हा प्रशासन नियोजन करीत आहे़परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणी पुरवठा केला जातो़ सिद्धेश्वर प्रकल्पामधून या बंधाºयामध्ये पाणी घेतले जाते़ तेथून पुढे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो़ परभणी आणि पूर्णा या दोन शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने ३० दलघमी पाणी निम्न दूधना प्रकल्प आणि सिद्धेश्वर प्रकल्पात राखीव ठेवले आहे़ निम्न दूधना प्रकल्पामध्ये १६ दलघमी तर सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये १४ दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे़ आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच हे पाणी आरक्षित करण्यात आले होते़२०१९ च्या जुलै महिन्यापर्यंत ८ पाणी पाळ्या घेऊन दोन्ही शहरांचा पाणीप्रश्न निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले़ परंतु, निम्न दूधना प्रकल्पामधून चारा पिकासाठी कालव्यांना पाणी दिल्याने हे नियोजन फिसकटले आहे़ दरम्यान, परभणी शहराला १ नोव्हेंबर रोजी पहिली पाणी पाळी सिद्धेश्वर प्रकल्पातून घेण्यात आली़ १़५ दलघमी पाणी राहटी बंधाºयात उपलब्ध झाले होते़ त्यावेळी हे पाणी दीड महिन्यापर्यंत पुरले़ सध्या बंधाºयातील पाण्याने तळ गाठला आहे़ त्यामुळे आगामी काळात शहराच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो़ ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांना पत्र देऊन १ दलघमी पाण्याची मागणी नोंदविली आहे़राहटी बंधाºयाची पाणी साठवण क्षमता दीड दलघमी असून, मनपाने एक दलघमीचीच मागणी केली आहे़ पाण्याचे आवर्तन देताना प्रत्यक्षात अधिक पाणी द्यावे लागते़ त्यामुळे संपूर्ण दीड दलघमी पाणी दुसºया आवर्तनात दिले जाईल, अशी अपेक्षा आहे़राहटीतून बेसुमार अवैध उपसापरभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी राहटी बंधाºयात पाणी घेतले जाते़ सध्या टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे असताना राहटी बंधारा परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत मोटारींच्या सहाय्याने पाण्याचा अवैध उपसा केला जात आहे़ मात्र हा अवैध उपसा रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे़ मोटारींनी पाणी उपसा सुरू असतानाही महापालिका आणि जिल्हा प्रशासन डोळेझाक करीत असल्याने पिण्याचे पाणी अवैधरित्या उपसा होत आहे़ विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे़ परंतु, या पथकांनीही आतापर्यंत राहटी बंधारा परिसरात कोणतीही कार्यवाही केली नाही़ राहटी बंधाºयातून होणारा अवैध पाणी उपसा थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे़
परभणी : एक दलघमी पाण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 1:01 AM