लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: येथील जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चार दिवसांच्या बाळाच्या मांडीमध्ये सुई ठेवून प्रचंड निष्काळजीपणा केल्या प्रकरणी शुक्रवारी शेकापचे जिल्हा सरचिटणीस किर्तीकुमार बुरांडे यांनी याबाबत येथील अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबराई करुन जाब विचारला.सेलू तालुक्यातील रायपूर येथील दीक्षा आतम उंडे या जिल्हा रुग्णालयात २३ जून रोजी प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. २४ जून रोजी त्यांना मुलगा झाला. नवजात बालकास कावीळची लक्षणे डॉक्टरांना दिसल्याने सामान्य रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये या नवजात बालकास दाखल करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी माता व बाळाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली; परंतु, नवजात बालक सातत्याने रडत असल्याची बाब मातेच्या लक्षात आली. याबाबत दवाखान्यातील कर्मचाºयांना अनेकदा विचारणा केली; परंतु, नवजात बालक असल्याने ते रडत असते, अशी त्यांची समजूत काढण्यात आली. १५ दिवसानंतर बाळाची आजी त्याला अंघोळ घालत असताना त्यांच्या हाताला काही तरी टोचल्याची जाणीव झाली. त्यावेळी त्यांनी बारकाईने पाहिले असता बाळाच्या मांडीत काही तरी असल्याचे लक्षात आले. त्यांनी बारकाईने पाहिले असता मांडीमध्ये झालेल्या गाठीत सुई आढळून आली. ही सुई त्यांनी काढली. याबाबतची माहिती शेकापचे जिल्हा सरचिटणीस किर्तीकुमार बुरांडे यांना दिल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह शुक्रवारी दुपारी ३ वाजता जिल्हा रुग्णालय गाठले. येथे त्यांनी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रकाश डाके यांना या बाबतची माहिती सांगितली व संबंधित जबाबदार कर्मचाºयावर कठोर कारवाई जोपर्यंत केली जाणार नाही, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयातून न हलण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर येथील अधिकारी व कर्मचाºयांची धावपळ उडाली.४याबाबत डॉ. डाके यांनी एनआयसीयू विभागाचे प्रमुख विशाल पवार यांना बोलावून घेतले व या प्रकरणाची चौकशी करुन दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी बुरांडे व कार्यकर्त्यांची समजूत काढून अहवाल आल्यानंतर जबाबदार कर्मचाºयांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर बुरांडे यांच्यासह कार्यकर्ते जिल्हा रुग्णालयातून निघून गेले.
परभणी : चार दिवसांच्या बाळाच्या मांडीत ठेवली सुई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:34 AM