मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाने पालाशयुक्त खताच्या अनुदानात कपात केली आहे. त्यामुळे खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरामध्ये २५ ते १३० रुपयांपर्यंत भाव वाढ केली आहे. २०१८-१९ च्या खरीप व रब्बी हंगामात ५० किलोच्या बॅगमागे २५ ते १३० रुपये भाव वाढीने तब्बल ३ लाख ९० हजार रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे.परभणी जिल्ह्यातील शेतकºयांचा खरीप व रब्बी हंगाम हा आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो. या दोन्ही हंगामात शेतकरी आपल्या जवळ जमा झालेली पुंजी बियाणे, औषधी व खतांवर खर्च करुन जुगाराचा डाव खेळतो. खरीप हंगामातील ६ व रब्बी हंगामातील ६ असे एकूण १२ महिने शेतकरी आपल्या शेतातील पिकांची मुलांप्रमाणे काळजी घेत जोपासना करुन उत्पन्न घेत असतो. जिल्ह्यामध्ये तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. तर २०१७-१८ या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, गहू या पिकातून शेतकºयांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अजूनही आर्थिक संकटातून वर आलेला नाही.सध्या शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे करीत आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या तर जून महिन्यात खरीप हंगामातील पेरणी सुरु होणार आहे. गत खरीप हंगामातील पिकातून हाती काही लागले नसल्याने शेतकरी आगामी हंगामातील बी-बियाणे, औषधी व खतांचा विचार करत आहे. जीएसटीमधून सरकी बियाणांची जरी सुटका केली असेल तरी पिकांसाठी अत्यावश्यक असलेल्या औषधी मात्र जीएसटीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकºयांना गत खरीप हंगामापासून औषधांची किंमत व त्यावरील जीएसटी असा भार सहन करावा लागत आहे.त्यातच येणाºया खरीप हंगामापासून केंद्र शासनाने पालाशयुक्त खताच्या अनुदानात कपात केली. त्यामुळे रासायनिक खत कंपन्यांनी खतांचे भाव २५ ते १३० रुपयापर्यंत वाढविले आहेत.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने यावर्षी खरीप हंगामात ५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना यावर्षीच्या खरीप हंगामात ९० मेट्रीक टन वेगवेगळ्या रासायनिक खताची गरज भासणार आहे. तर येणाºया रब्बी हंगामासाठी ६० मे.टन खताची आवश्यकता असते. त्यामुळे २०१८-१९ या आर्थिक वर्षात शेतकºयांना दोन्ही हंगामासाठी १५० मे. टन खताची गरज भासते.एका ५० किलोच्या खताची बॅग २५ ते १३० रुपये प्रमाणे भाववाढ केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना ३ लाख ९० हजार रुपयांचा भार खताच्या दरवाढीपोटी सहन करावा लागणार आहे.अशी असणार आहे खताची दरवाढसध्या बाजारपेठेमध्ये नवीन दराचा खत उपलब्ध झाला आहे. त्यानुसार प्रति ५० किलो खताच्या बॅगचा भाव असा- १०:२६:२६ या रासायनिक खताचा जुना दर १०५० असा होता. तो आता ८० रुपयांनी दरवाढ होऊन ११३५ रुपयांना मिळणार आहे. १२:३२:१६ चा जुना दर १०६० असा होता. त्यात ८० रुपयांनी दरवाढ होऊन ११४० रुपये असा भाव झाला आहे. पोटॅशचा जुना दर ६२० रुपये असा होता. तो आता ६७० रुपयांना झाला आहे. १५:१५ हा ८८७ रुपयांना मिळत होता. तो आता ९७० रुपयांवर जावून पोहचला आहे. १९:१९: १९ हा खत १०७१ रुपयांना मिळत होता. तो आता ११४० वर पोहचला आहे. डीएपीची बॅग ११०० रुपयांना मिळत होती. त्याते १३० रुपयांची दरवाढ झाली आहे. महाधन कंपनीचा २४:२४:० हा १०१५ रुपयांना मिळत होता. तो आता ९५ रुपयांची दरवाढ होऊन १११० रुपयांना मिळणार आहे.
परभणी : शेतकऱ्यांवर आता खत दरवाढीचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:39 AM