लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या एक-दोन दिवसांत लागण्याची शक्यता असल्याने शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये कंत्राटदारांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे़विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून, राजकीय पक्षांनी जिल्ह्यात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे़ दुसरीकडे प्रशासकीयस्तरावरही निवडणुकीसाठी लागणारी यंत्रणा उभी केली जात आहे़ या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास जिल्ह्यातील विकास कामांना मंजुरी मिळणार नाही़ झालेल्या विकास कामांची बिले निघणार नाहीत, अशी धास्ती कंत्राटदारांना लागली आहे़ त्यामुळे दोन आठवड्यांपासूनच विकास कामांचे प्रस्ताव टाकणे, या प्रस्तावांना मंजुरी घेणे तसेच जुनी बिले काढून घेण्यासाठी कंत्राटदारांची धावपळ सुरू आहे़त्यातच आचारसंहिता लागू होण्यासंदर्भात सोशल मीडियातून वेगवेगळे वृत्त येत आहेत़ त्यामुळे अनेकांनी आचारसंहितेची धास्ती घेतली असून, निवडणूक विभागाची पत्रकार परिषद घेवून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आपले काम हातावेगळे झाले पाहिजे, अशी घाईगडबड सुरू झाली आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या शासकीय कार्यालयांमध्ये विकास कामांसाठी निधीचे वितरण केले जाते़ त्यामुळे या तीनही ठिकाणी कार्यकर्ते तसेच कंत्राटदारांची गर्दी दिसून येत आहे़ बुधवारी जिल्हा परिषदेच्या आवारात मोठ्या प्रमाणात चार चाकी वाहनांचा गराडा दिसून आला़ काही कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या आवारात थांबले होते तर काही जण बांधकाम विभाग, अर्थ विभागाच्या कार्यालयासमोर गर्दी करून असल्याचे पहावयास मिळाले़ महानगरपालिकेतही अशीच स्थिती आहे़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीची धास्ती घेवून कामे उरकून घेण्याची घाई सुरू असल्याचे दिसत आहे़ग्रामीण भागातील कंत्राटदारही जि़प़त४ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे हाती घेण्यात आली आहेत़ २५:१५ च्या निधीतून सभागृह, रस्ते, नालीची कामे केली जातात़ हा निधी आमदार, खासदारांच्या स्थानिक निधीतून वापरला जातो़४त्यामुळे ही कामेही वेळेत पूर्ण व्हावीत, आचारसंहितेपूर्वी कामांना मंजुरी मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कंत्राटदार, कार्यकर्त्यांची गर्दी पहावयास मिळाली़४या विभागांतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या टेबलवरही मोठ्या प्रमाणात फाईलींचा गठ्ठा असल्याचे दिसून आले़महानगरपालिकेतही कंत्राटदारांचा राबता४परभणी शहरातही अनेक विकास कामे हाती घेतली आहेत़ काही कामे निविदेच्या प्रक्रियेत आहेत तर काही बिले काढण्याच्या स्थितीत आहेत़४शहरातील रस्त्यांची कामे, मुलभूत सुविधांची कामे तसेच आमदार, खासदारांच्या स्थानिक निधीतून घेतलेली कामे, दलितोत्तर आणि विशेष निधीतूनही कामे घेण्याचा सपाटा सुरू आहे़ त्यामुळे या कामांना आचारसंहितेपूर्वी मंजुरी मिळावी, यासाठी कंत्राटदार, राजकीय पक्ष पदाधिकाºयांचीही धडपड सुरू आहे़ त्यातूनच महापालिकेतील शहर अभियंता विभाग आणि लेखा विभागात गर्दी पहावयास मिळत आहे़४लेखाधिकारी उपस्थित नसतील तर ते कामानिमित्त ज्या ठिकाणी गेले तेथेही या कामांसंदर्भात पाठपुरावा केला जात असल्याचे पहावयास मिळाले़
परभणी : बिले काढण्यासाठी कार्यालये गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:14 AM