लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस एक वर्षाचा सश्रम कारावास व तीन महिन्याची शिक्षा सुनावली आहे़ हा निकाल पाथरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ़ त़ऩ कादरी यांनी १२ फेब्रुवारी रोजी सुनावला आहे़पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी १ जानेवारी २०१५ रोजी पाथरी पोलीस ठाण्यात भारत रामभाऊ गलबे (रा़ रेवगाव ता़ पाथरी) याच्या विरूद्ध भा़द़ंवि. ३५४, ४४७ नुसार गुन्हा नोंद झाला होता़ या प्रकरणाचा तपास करून पाथरी पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते़ यावरून पाथरी न्यायालयात खटला सुरू होता़ सरकारी वकील डी़आऱ काठूळे यांनी पाच साक्षीदारांची साक्ष घेतली़ सरकारी वकील डी़आऱ काठुळे यांनी घेतलेला साक्षीपुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डॉ़ त़ ऩ कादरी यांनी आरोपी भारत रामभाऊ गलबे यास कलम ३५४ भा़द़ंवि़साठी एक वर्ष सश्रम कारावास व ५०० रूपये दंड तसेच कलम ४४७ भा़दं़वि़साठी तीन महिने शिक्षा व १०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे़
परभणी : विनयभंग प्रकरणी एक वर्षाचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:24 AM