लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी जानेवारी महिन्यातच कोरडी ठाक पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातील काही गावांची तहान भागविणाऱ्या डोंगरपट्यातील मासोळी मध्यम प्रकल्पातही केवळ ५.४० दलघमी एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने शहरासह काही गावांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.गंगाखेड शहरासह ग्रामीण भगातील काही गावे गोदावरी नदीकाठावर तर बहुतांश गावे डोंगरपट्यात वसलेली आहेत. गेल्या काही वर्षात तालुक्यात समाधानकारक पर्जन्यमान होत नसल्याने गोदावरी नदीकाठावर असलेल्या गंगाखेड तालुक्यालाही भीषण दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. चालू वर्षात अल्प प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने व गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाºयाचे दरवाजे नादुरुस्त असल्याने बंधाºयाबरोबर गोदावरी नदीही कोरडीठाक पडली आहे. तर डोंगरपट्यात असलेल्या मासोळी मध्यम प्रकल्पातही पाण्याची साठवण झाली नाही. आज घडीला मासोळी धरणात मृत साठ्यातील केवळ ५.४० दलघमी एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने भर हिवाळ्यातच तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे डोंगरातील गावांसह गोदावरी नदीकाठच्याही बहुसंख्य गावांनी विहीर, बोअर, अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात सादर केले आहेत. यातील काही गावांनी तर टँकरची मागणी पं.स. कार्यालयाकडे नोंदविली आहे. तालुक्यात निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीमुळे जनावरांच्या चाºयाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अवैध पाणी उपसा सुरूच४तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात खळी शिवारातील गोदापात्रापासून ते मुळी बंधाºयापर्यंत साचलेल्या पाण्याचा अवैधरित्या उपसा सुरू आहे.४याबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना व कारवाई केली जात असली तरीही अवैध पाणी उपसा सुरूच आहे. येत्या काळात या डोहातील पाणी उपसा थांबला नाही तर गोदावरी नदीकाठावरील गावातील ग्रामस्थांनाही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.४त्याच बरोबर या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तातडीने कारवाईस सुरूवात करणे आवश्यक आहे.असे केले आहेपाण्याचे नियोजन४मासोळी प्रकल्पात असलेल्या मृत साठ्यातील पाणी केवळ ५.४० दलघमी असल्याने जून २०१९ अखेरपर्यंत गंगाखेड शहरासाठी १.५० दलघमी, गंगाखेड शुगर ०.५० दलघमी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील इसाद, माखणी, पोखर्णी, खोकलेवाडी आदी गावांसाठी ०.५० दलघमी असे एकूण २.५० दलघमी पाणी वापराचे नियोजन प्रशासनाने केले आहे.४यातील २.५० दलघमी पाणी हे गाळ व बाष्पीभवनामध्ये जाईल, असा अंदाज बांधत जून २०१९ अखेर मासोळी प्रकल्पात ०.४० दलघमी पाणीसाठा शिल्लक राहील, असा अंदाज मासोळी प्रकल्पाचे शाखाधिकारी रामेश्वर उबाळे यांनी लावला.४ त्याच बरोबर मासोळी प्रकल्पातील पाणीसाठा हा जून २०१९ अखेर पर्यंत पुरावा यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन शाखाधिकारी उबाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
परभणी : फक्त ५ दलघमी पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:51 AM