शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

परभणी : जाहीर प्रचारासाठी उरले केवळ पाच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:14 AM

विधानसभा निवडणुकीत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे प्रचार करण्यासाठी केवळ ५ दिवस शिल्लक राहिले असून, या कमी काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने उमेदवारांनी प्रचाराची राळ उडविली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधानसभा निवडणुकीत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे प्रचार करण्यासाठी केवळ ५ दिवस शिल्लक राहिले असून, या कमी काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने उमेदवारांनी प्रचाराची राळ उडविली आहे़परभणी जिल्ह्यात परभणीसह गंगाखेड, सेलू-जिंतूर आणि पाथरी या चार विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे़ २१ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला़ सुरुवातीच्या काळात संथगतीने होत असलेला हा प्रचार उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापासून गती घेवू लागला़ प्रचारसभा, प्रचार रॅली, मतदारांच्या गाठीभेटी आणि ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून प्रचार सुरू झाला आहे़परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुती, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे़ या मतदार संघात परभणी शहर आणि परिसरातील ५३ गावांचा समावेश आहे़ शहरी भागात उमेदवार व कार्यकर्त्यांनी प्रचारावर लक्ष केंद्रीत केले आहे़ त्याचबरोबर ग्रामीण भागातही प्रचाराची यंत्रणा राबविली जात आहे़ प्रत्येक गावामध्ये त्या त्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे़शहरातील प्रभागांमध्येही कार्यकर्त्यांना जबाबदारी वाटून दिली असून, घरोघरी फिरून कार्यकर्ते आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत़ पाथरी, गंगाखेड आणि जिंतूर या मतदार संघामध्येही प्रचार शिगेला पोहचला आहे़ उमेदवारांच्या प्रचार रॅल्या काढल्या जात असून, ध्वनीक्षेपकही शहरासह ग्रामीण भागात फिरविले जात आहेत़ त्यामुळे जिल्हाभरात निवडणुकीचे वातावरण तापत आहे़यावेळच्या निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १४ दिवसांचा कालावधी मिळाला़ त्यामुळे कमी काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे़ २१ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, त्यापूर्वी ४८ तास आधी प्रचार तोफा थंडावणार आहेत़ १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार थांबेल़त्यामुळे उमेदवारांकडे आता केवळ ५ दिवसांचा कालावधी शिल्लक असून, या काळात मतदारांशी संवाद साधण्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच कॉर्नर बैठका, विशिष्ट संघटनांच्या बैठका, स्टार प्रचारकांच्या प्रचारसभा आणि ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून प्रचार करण्यावर भर दिला जात आहे़सकाळी ६ वाजेपासूनच प्रचार४प्रचारासाठी केवळ ५ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने उमेदवारांनी जास्तीत जास्त वेळ मतदार संघात दौरे करण्यासाठी नियोजित केला आहे़ त्यामुळे दररोज सकाळी ५ वाजेपासूनच उमेदवार घराबाहेर पडत असून, ग्रामीण भागासह शहरी भागात मतदारांशी संवाद साधला जात आहे़४विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू आहेत़ थेट प्रचाराबरोबरच सोशल मीडियाचाही आधार प्रचारासाठी घेतला जात आहे़ व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर या समाजमाध्यमातून उमेदवार मतदारांच्या संपर्कात राहत आहेत़ काही उमेदवारांनी बल्क मॅसेज ही सुविधा घेवून मतदारांशी संपर्क साधला आहे़यादीनिहाय मतदारांशी संपर्क४मतदान प्रक्रिया जवळ येऊन ठेपल्याने कार्यकर्त्यांनी आता मतदार यादीतून मतदारांची नावे शोधण्यास सुरुवात केली आहे़ मतदार यादीतील नावांचा शोध घेवून मतदारांशी संपर्क केला जात आहे़ बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना मतदानाची तारीख आणि मतदान केदं्राची माहिती दिली जात आहे़केंद्र, राज्यस्तरावरील नेत्यांच्या सभा४परभणी विधानसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचारासाठी केंद्र आणि राज्यस्तरावरील नेत्यांना पाचारण केले होते़४आतापर्यंत जिंतूर विधानसभा मतदार संघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, परभणी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे बॅ़ अससोद्दीन ओवीसी यांच्या सभा जिल्ह्यात झाल्या आहेत़४येत्या पाच दिवसांत स्टार प्रचारकांच्या सभा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019