लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : हिंदी भाषा ही जागतिक भाषा असून, ती साहित्यापुरती मर्यादित न राहता बाजाराची भाषा बनली आहे़ त्यामुळे या भाषेच्या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन प्रा़ डॉ़ शिवदत्ता वावळकर यांनी केले़येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात वावळकर बोलत होते़ या प्रसंगी प्रा़ डॉ़ संजय जाधव, विभागप्रमुख डॉ़ शेषराव राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती़ वावळकर म्हणाले, मुद्रण शोधक, बँक, पोस्ट, अनुवाद, जाहिरात, धारावाहिक, सिनेमा, स्टेनो, शुद्धलेखन या क्षेत्रामध्ये हिंदी अभ्यासक्रम पूर्ण कणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत़ हिंदी विषय हा फक्त पारंपरिक शिक्षक किंवा प्राध्यापक होण्यासाठी शिकविला जाऊ नये तर देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर या विषयात असलेल्या संधी लक्षात घेऊन तो अभ्यासला जावा, असेही मत वावळकर यांनी व्यक्त केले़ या प्रसंगी प्रा़ डॉ़ संजय जाधव, डॉ़ शेषराव राठोड यांनीही मनोगत व्यक्त केले़ प्रा़ डॉ़ जयंत बोबडे यांनी सूत्रसंचालन केले़ मुजावर अमीन यांनी आभार मानले़ व्याख्यानास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते़
परभणी : हिंदी भाषेत रोजगाराच्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:51 PM