लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील एकूण १४९ सर्व्हे नंबरमधील नवीन बांधकाम, हस्तांतर परवानगी आणि फेरफार संदर्भात २०१५ पूर्वीप्रमाणेच कार्यवाही सुरू ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी २८ मार्च रोजी काढले आहेत़शहरातील १४९ सर्वे नंबरमधील बांधकाम परवाने, हस्तांतर आणि दुरुस्त्या १८ मार्च २०१५ पासून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशानुसार बंद होत्या़ त्यामुळे मालमत्ताधारक अडचणीत सापडले होते़ तीन वर्षांपासून हा प्रश्न रखडलेला असल्याने आ़डॉ़ राहुल पाटील यांनी १४९ सर्व्हे नंबरबाबत विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता़ १८ मार्च २०१५ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी एस़पी़ सिंह यांनी तोंडी आदेश देऊन शहरातील १४९ सर्व्हेमधील १४७६़२४ एकर जागा अनधिकृत ठरवून या जागेवरील मालमत्ताधारकांचे फेरफार, हस्तांतर प्रक्रिया रद्द केल्या होत्या़ महानगरपािलकेनेही बांधकाम परवाने देण्यास नकार दिला़ त्यामुळे मालमत्ता धारकांत असंतोष आहे़, असे आ़ राहुल पाटील यांनी विधानसभेत निदर्शनास आणून दिले़ त्याचप्रमाणे निजामकाळापासून मालमत्ताधारक या जागेवर राहत असून, त्यांच्याकडे पीआर कार्ड, सातबारा व इतर मालकी हक्काचे प्रमाणपत्र असताना त्यांचे फेरफार हस्तांतरण रद्द करण्याचा अधिकार मनपाला नाही, असेही नमूद केले होते़ तसेच बलदिया सरकारने लिलावाद्वारे जमिनीची विक्री केल्याने ज्या लोकांनी जमिनी विकत घेतल्या, त्यांच्या नावे रजिस्ट्री होऊन पीआर कार्ड वितरित करण्यात आले़ १९८१ मध्ये सिटी सर्व्हेमध्ये याबाबत नोंद करण्यात आली असून, शहराचा विकास आराखडाही तयार झाला आहे़असे असताना तत्कालीन जिल्हाधिकाºयांच्या केवळ तोंडी आदेशाद्वारे या जमिनी अनधिकृत ठरविल्याने मालमत्ता हस्तांतरण, फेरफार प्रक्रिया बंद करण्यात आली़ ही कारवाई नियमबाह्य असल्याचे आ़ पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले़आ़ पाटील यांच्या या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री डॉ़ रणजीत पाटील यांनी १४९ सर्वे नंबरमधील हस्तांतरण, फेरफार व बांधकामे परवाने नियमित करण्यासंदर्भात अधिवेशन संपण्यापूर्वी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते़ या आश्वासनामुळे हा प्रश्न जवळपास मार्गी लागला होता़ २८ मार्च रोजी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनीही या संदर्भात आदेश काढले आहेत़आ.डॉ.पाटील यांच्या लक्षवेधी नुसार नगरविकास राज्यमंत्री डॉ़रणजीत पाटील यांनी विधी मंडळात दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने या सर्व्हे नंबरच्या बाबतीत नवीन बांधकाम व दुरुस्त्यांना परवानगी तसेच फेरफार करण्याची कार्यवाही चालू ठेवावी, असे या आदेशात नमूद केले आहे़ त्यामुळे शहरातील १४९ सर्व्हे नंबरमधील मालमत्ताधारकांचा तीन वर्षांपासूनचा रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे़स्वतंत्र नोंदीही ठेवा : जिल्हाधिकारी१४९ सर्व्हे नंबरमधील जमिनीचे हस्तांतरण, बांधकाम परवाने आणि फेरफार २०१५ पासून बंद होते़ तत्कालीन जिल्हाधिकाºयांच्या तोंडी आदेशानंतर महानगरपालिकेनेही ही प्रमाणपत्रे देणे बंद केले़ त्यामुळे मालमत्ताधारक अडचणीत सापडले होते़ आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर नगरविकास मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी २०१५ पूर्वी जशी प्रक्रिया सुरू होती, ती चालू ठेवावी, असे आदेश काढले असून, या प्रकारे देण्यात येणाºया बांधकाम परवानग्या व फेरफारच्या बाबतीत स्वतंत्रपणे नोंदी, अभिलेखे ठेवण्याची दक्षता घ्यावी, असे सूचित केले आहे़जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी महापालिका आयुक्तांना हे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेतून आता सर्व्हे नंबर संदर्भात बांधकाम परवाने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.महापालिकेने मागविले होते मार्गदर्शनआ़ डॉ़ राहुल पाटील यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडल्यानंतर महानगरपालिकेनेही सकारात्मक कारवाई करीत या विषयी वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागविले होते़ तसेच याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार तातडीने सकारात्मक कारवाई केली जाईल, असेही ठरविले होते़ त्यामुळे आता जिल्हाधिकाºयांनी या संदर्भात आदेश काढल्याने लवकरच १४९ सर्व्हे नंबरमधील रखडलेले बांधकाम परवाने, फेरफारची प्रकरणे निकाली निघण्यास मदत होणार आहे़
परभणी: फेरफार, बांधकाम परवाने देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 1:08 AM