लोकमत न्यूज नेटवर्कपोखर्णी (परभणी) : परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे ‘नरहरी नाम अमृतसार भजन करावे वारंवार’ च्या गजरामध्ये मंगळवारी विजयादशमीची पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली.श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे १०० वर्षापासूनची विजयादशमी पालखी सोहळ्याची परंपरा आहे. विजयादशमीनिमित्त श्री नृसिंह देवाची पालखी मिरवणूक निघते. यावर्षी सायंकाळी मंदिर परिसरात हरिपाठ घेण्यात आला. यावेळी गाव व परिसरातील भजनी मंडळीसह २५१ बाल भजनी मंडळे या सोहळ्यात सहभागी झाली होेती.यावेळी मंदिर परिसर भक्तीमय झाला होता. त्यानंतर श्रींची पालखी मिरवणूक निघाली. टाळ, मृदंगाचा गजर, भजन, ढोलताशा वादन आणि नरहरी श्यामराज की जय, चा जयघोष करीत श्रींची पालखी मिरवणूक ग्राम प्रदक्षिणा घालत येथे थांबली. शमी वृक्षाचे पूजन करून सोने लुटले. त्यानंतर श्रींची पालखी मिरवणूक मंदिराकडे निघाली. त्यानंतर देवाची आरती करण्यात आली. या पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.वालूर येथे दसरा महोत्सववालूर- सेलू तालुक्यातील वालूर येथे ८ आॅक्टोबर रोजी दसरा उत्साहात साजरा करण्यात आला.वालूर येथे २० फूट उंचीच्या रावणाचे दहन सरपंच संजय साडेगावकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर श्री बालाजी मंदिरात महिलांनी व्यंकटेश स्तोत्र पारायण केले. रात्री बालाजी देवतेची पालखी मिरवणूक गावातून काढण्यात आली.या पालखी मिरवणुकीत वाल्मिकेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व ह.भ.प. रामेश्वर महाराज कवळे, महादेव महाराज बोरगावकर यांच्यासह महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पूर्णेत रावण दहन४पूर्णा- शहरातील राजे संभाजी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने ८ आॅक्टोबर रोजी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.४यावेळी खा. संजय जाधव, संयोजक नितीन कदम, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुधाकर खराटे, साहेब कदम, रामभाऊ रनेर, भगवान धस, संतोष एकलारे, दशरथ भोसले, तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे, डॉ. विनय वाघमारे, डॉ. अजय ठाकूर, हिराजी भोसले, शहरप्रमुख मुंजाजी कदम, सोपान महाराज बोबडे, प्रताप कदम, श्याम कदम, अॅड. राज भालेराव, प्रमोद एकलारे, रवी जैयस्वाल, राजू धूत, गजानन हिवरे, राजू माने, बालाजी वैद्य, माणिकराव सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.४दरम्यान, शहरातील जुना मोंढा मैदानात रावण दहन पाहण्यास मोठी गर्दी झाली होती.
परभणी : नरहरी नामाच्या गजरात पालखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 11:49 PM