प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमागील काही वर्षांपासून परभणी जिल्हा तापमानामुळे महाराष्ट्रासह देशभरात ओळखला जात आहे. नेमके परभणीतचतापमान का वाढते, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणीत वेगळे काय आहे आणि तापमानवाढीसाठी कोणते घटक कारणीभूत ठरले, या अनुषंगाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामान शास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ.के.के.डाखोरे यांच्याशी साधलेला संवाद...परभणीत तापमान का वाढते?सध्या आपण उत्तर गोलार्धात असून रेखांशावर १९ अंश, १६ मिनिट व ७६ अंश ४७ मिनिट हे जिल्ह्याचे स्थान आहे. रेखांशावरील हे स्थान अगदी वरच्या बाजुला असल्याने सूर्य किरणे प्रखरतेने जाणवतात. तसेच जंगलाचे प्रमाण कमी, संपूर्ण जिल्हा सपाट भूभागावर वसलेला आहे. याशिवाय निर्माण होणारा कार्बनडॉय आॅक्साईड शोषून घेण्यासाठी झाडांची संख्या कमी असल्याने त्याचा सर्व परिणाम तापमान वाढीवर होत आहे.तापमान वाढीस कोणते घटक कारणीभूत आहेत ?हवा, जमीन याबाबीही तापमान वाढीसाठी कारणीभूत आहेत. परभणी जिल्ह्यात काळी जमीन असून काळी जमीन तापमान शोषूण घेते. परिणामी अधिक काळ जमीन तापलेली राहते. या शिवाय या काळात शुष्क वारे वाहतात. या वाऱ्यांमध्ये दवबिंदू नसतात. परिणामी वाºयासोबत तापमान वाढत जाते.तापमान कसे वाढत गेले ?सर्वसाधारणपणे ३० वर्षांच्या तापमानाचा अभ्यास करता एप्रिल महिन्यात ३८.९ ते ४१.३ या दरम्यान सर्वसाधारण तापमान राहिले आहे. त्यास २७ एप्रिल १९९० (४४), १७ एप्रिल १९९१ (४४.६), २९ एप्रिल २००४ (४३.७) आणि १७ एप्रिल २०१७ (४३.१) हा अपवाद आहे. या सर्व तापमानांपेक्षाही अधिक तापमान यावर्षी २७ एप्रिल रोजी ४५ अंश नोंद झाले. त्यामुळे यावर्षी तापमान तर वाढलेच. शिवाय गत ३० वर्षांच्या एप्रिल महिन्यातील तापमानाचा उच्चांक नोंद झाला आहे.
परभणी : रेखांशावरील स्थानामुळेच परभणीत चढतोय पारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:42 PM