शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

परभणी : मानव विकासची बस पालकांनीच रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 12:38 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमानोली ( परभणी ) : शालेय विद्यार्थिनींसाठी सुरु करण्यात आलेली मानव विकास मिशनची बस नेहमीच उशिराने येत असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तब्बल तीन तास बस रोखून धरली. एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.मानवत तालुक्यातील मानोली येथून दररोज ५० ते ...

लोकमत न्यूज नेटवर्कमानोली (परभणी) : शालेय विद्यार्थिनींसाठी सुरु करण्यात आलेली मानव विकास मिशनची बस नेहमीच उशिराने येत असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तब्बल तीन तास बस रोखून धरली. एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.मानवत तालुक्यातील मानोली येथून दररोज ५० ते ६० विद्यार्थिनी मानवत येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. याकरीता मानव विकासच्या माध्यमातून मानोली येथून सकाळी ७ वाजता मानवतसाठी एस.टी. बस सुरु करण्यात आली होती; परंतु, गेल्या काही दिवसांपासून ही बस सातत्याने उशिराने येत आहे. काही वेळा तर ही बस रद्दही केली जाते. त्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक संतप्त झाले होते. याबाबत वाहक व चालकांकडे तक्रारी करुनही सुधारणा झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मानोली येथे आलेली बस रोखून धरली व नेहमी उशिराने बस का येते, याचा जाब वाहक व चालक यांना विचारला. जोपर्यंत एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी येणार नाहीत, तोपर्यंत एस.टी. बस सोडणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतली. जवळपास ३ तासानंतर एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी मानोली येथे आले व त्यांनी यापुढे वेळेत बस पाठविली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनStudentविद्यार्थी