शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

परभणी : निवडणुकीच्या तोंडावर पक्षीय गटबाजी चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:03 AM

विधानसभा निवडणुकीच्या तारखा येत्या १ ते २ दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असताना जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्षांमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, स्वकियांची खेचाखेची करून सोयीचे राजकारण तडीस नेण्याचा ‘परभणी पॅटर्न’ पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याचे पहावयास मिळत आहे़

अभिमन्यू कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधानसभा निवडणुकीच्या तारखा येत्या १ ते २ दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असताना जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्षांमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, स्वकियांची खेचाखेची करून सोयीचे राजकारण तडीस नेण्याचा ‘परभणी पॅटर्न’ पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याचे पहावयास मिळत आहे़पक्ष निष्ठा बाजुला ठेवून सोयीचे राजकारण करण्याचा ‘परभणी पॅटर्न’ गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात बिनदिक्कतपणे सुरू आहे़ विरोधी पक्षातील नेत्याचा पराभव करण्याऐवजी स्वपक्षीयांची खेचाखेची करून त्यांचेच पानीपत करण्याची उठाठेव अनेक वर्षांपासून जिल्ह्यात सुरू आहे़ त्यामुळेच आजपर्यंत परभणीला राज्यस्तरावरील नेता मिळू शकलेला नाही़ राजकारणात वैयक्तीत मतभेद असू शकतात़ सार्वजनिक जीवनात काम करीत असताना विचारभिन्नता असणे स्वाभावीक आहे; परंतु, जिल्ह्याच्या राजकारणात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे़ प्रत्येक निवडणुकीत सातत्याने आढळणारा हा गुण या विधानसभा निवडणुकीतही प्रकर्षाने जाणवू लागला आहे़जिल्ह्याने काही दिवसांपुर्वीच तसा लोकसभेलाही अनुभव घेतला होता़ आता विधानसभेची निवडणूक १९ किंवा २० सप्टेंबर रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत़ गेल्या ४० वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व मिळविलेल्या शिवसेनेतही पहिल्या निवडणुकीनंतर सुरू झालेले राजकीय हेवेदाव्याच राजकारण आजही कायम आहे़ या राजकारणात अनेक नेते मंडळींचे राजकीय करीअर संपून गेले़ तर अनेकांनी करीअरही केले; परंतु, परिस्थितीमध्ये मात्र बदल होत नाही़ जिल्ह्यात सद्यस्थितीतही शिवसेनेचे खा़ बंडू जाधव व आ़ डॉ़ राहुल पाटील यांचे दोन गट कायम असून, हे दोन गट एकमेकास आजही पाण्यात पाहत आहेत़ कुरघोडी करण्याची संधी त्यांच्याकडून सोडली जात नाही़ अशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसून येत आहे़ जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी व शहराध्यक्ष अ‍ॅड़ स्वराजसिंह परिहार यांच्यात गेल्या काही महिन्यांमध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाले आहेत़ लोकसभा निवडणुकीला त्याचा परभणीकरांना प्रत्यय आला आहे़ आता विधानसभेला पुन्हा हे मतभेद चर्चेला आले आहेत़ निमित्त ठरले आहे, परभणी विधानसभेच्या जागेचे़ आ़ दुर्राणी यांनी काँग्रेसकडून सुरेश नागरे यांना परभणी विधानसभेची उमेदवारी देण्यास तिव्र विरोध केला आहे तर अ‍ॅड़ परिहार यांनी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य राहील़ त्यामुळे युतीच्या उमेदवाराला फायदा होईल, असे स्टेटमेंट करून वातावरण गढूळ करू नका, असा सल्ला दुर्राणी यांना दिला आहे़काँग्रेस पक्षातही फारसे आलबेल नाही़ या पक्षातील नेत्यांमध्येही तीव्र मतभेद आहेत़ अशातच काँग्रेस पक्षाला जिल्हाभरात एकसंघतेने बांधून ठेवणारा नेता मिळेनासा झाला आहे़ त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत़ परिणामी प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भूमिका सोयीने ठरविली जात आहे़ राज्य व राष्ट्रीय पातळीवर सत्तेत असलेला भाजपाही याला अपवाद नाही़ उघड-उघड या पक्षातील नेते बोलत नसले तरी खाजगीमध्ये ते एकमेकांची खेचाखेची करण्याची संधी सोडत नाहीत़ त्यामुळे कार्यकर्त्यांची गोची होते़ जिल्ह्यातील विविध पक्षातील नेते आपसातील मतभेद बाजुला सारून कधी विधानभवनात तर कधी देवगिरी एक्सप्रेसमध्ये तर कधी मंत्रालयात हास्यविनोद करताना दिसून येतात़ इकडे कार्यकर्ते मात्र एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात़ त्यातूनच आक्रमक भूमिका घेवून हाणामाऱ्यांचे प्रकारही जिल्ह्यात घडले आहेत़ या निवडणुकीतही असाच काहीसा अनुभव जिल्ह्याला येत असला तरी त्यामध्ये सुधारणा होण्याचीही शक्यता वाटत नाही़ प्रामाणिक कार्यकर्त्यां संदर्भात एक शायर म्हणतात़़़ भरे बाजार में अक्सर खाली हात लौंट आता हूं़़़ पहले पैसे नही थे अब ख्वाईशे नही रही़़़असे आहेत जिल्ह्यातील नेत्यांमध्ये मतभेद४जिल्ह्यात शिवसेनेत खा़ बंडू जाधव आणि आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यात मतभेद आहेत़ भाजपात माजी आ़ विजय गव्हाणे आणि महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्यात मतभेद आहेत़ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी आणि महानगराध्यक्ष अ‍ॅड़ स्वराजसिंह परिहार, माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यात मतभेद आहेत़ तसेच गंगाखेडचे आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे आणि जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्यातही कमालीचे मतभेद आहेत़काँग्रेसमध्ये सर्व स्वतंत्रच४जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील मतभेद हा जाहीरपणे चर्चेचा फारसा विषय झाला नसला तरी या पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्येही बरेच मतभेद आहेत़ जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्या मनपातील भूमिकेला अनेक वेळा त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी विरोध केला आहे़ दुसरीकडे काँग्रेसच्याच चिन्हावर निवडून आलेले गंगाखेड आणि सोनपेठचे नगराध्यक्ष कधीही काँग्रेसच्या कार्यक्रमात दिसत नाहीत़ तसा विषयही कधी जिल्हाध्यक्ष वरपूडकर यांनी केला नाही़

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019