लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : परभणी-जिंतूर व जिंतूर-औंढा या रस्त्यावर ठिक ठिकाणी पडलेले खड्डे व प्रचंड उडणारी धूळ यामुळे प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे़ यामुळे प्रवाशांच्या मणक्याच्या आजारासह डोळ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.परभणी-जिंतूर रस्त्याचे काम दीड वर्षापासून संथगतीने सुरू आहे़ हे काम करीत असताना संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजुंना असणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण व्यवस्थित न केल्याने या रस्त्यावर प्रचंड खड्डे व धूळ निर्माण झाली आहे़ परिणामी वाहनधारकांना दिवसा वाहनांचे दिवे लावून प्रवास करावा लागत आहे़ यामुळे अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे़ याशिवाय दुचाकी वाहनांना तर हा प्रवास जीवघेणा ठरत आहे़ या सर्व प्रकाराला संबंधित कंत्राटदार जबाबदार असून, संबंधिताने पर्यायी मार्गाचे कोणतेही नियम न पाळल्याने त्याचा त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे़जिंतूर-औंढा रस्त्यावरही प्रचंड खड्डे पडले आहेत़ मागील वर्षी या रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते़ अवघ्या सहा महिन्यांतच जिंतूर ते पुंगळा, पुंगळा ते आडगाव फाटा हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे़ मोठ मोठे खड्डे पडल्याने खड्डा चुकविताना अनेक अपघात होत आहेत़ विशेष म्हणजे, या रस्त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च होवूनही रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’च आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़ अशीच परिस्थिती जिंतूर-येलदरी या मार्गावरही झाली आहे़ या मार्गावरही अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रवास करीत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ या मुख्य रस्त्याप्रमाणेच तालुक्याला जोडणाºया अनेक डांबरी रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे़ या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वीच झालेला खर्च वायफळ गेला असून, सा़बां़ विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे़नेत्यांची चुप्पी४तालुक्यातील विविध रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत एकाही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी याबाबत चकार शब्दही काढलेला नाही़ विशेष म्हणजे, जिंतूर-परभणी या रस्त्यावरील प्रवाशांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत़ परंतु, राजकीय पक्ष गप्प का? याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे़४अशीच अवस्था जिंतूर-औंढा या रस्त्याची झाली आहे़ सहा महिन्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे सा़बां़ विभागाने बुजविले होते़ आज मात्र या रस्त्यावरून प्रवास करणे वाहनधारकांना कठीण झाले आहे़ याकडेही राजकीय पक्षांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते़
परभणी : प्रवाशांना मरणयातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:51 AM