लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीनचे शनिवारी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले़ त्यामुळे दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील रुग्णांना अखेर शनिवारी खऱ्या अर्थाने सिटीस्कॅन मशीन रूग्णसेवेसाठी उपलब्ध झाली आहे़परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय मराठवाड्यातील सर्वात मोठे रुग्णालय आहे़ या रुग्णालयात जिल्ह्यातील कानाकोपºयासह पर जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी येतात़ परंतु, या रुग्णालयातील सुविधांअभावी रुग्णांना गैरसोयींचा सामना करावा लागला़ दोन वर्षापूर्वी जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद या रुग्णालयात हलविण्यात आली़ तेव्हापासून या रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन उपलब्ध नव्हती़ त्यामुळे उपचारासाठी येणाºया रुग्णांना आर्थिक झळ सहन करत बाहेरून सिटीस्कॅन करून आणावा लागत होता़त्यामुळे रुग्णांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता़ रुग्णांच्या भावना लक्षात घेता स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आरोग्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला़ परभणी जिल्ह्यातून होणाºया पाठपुराव्याची दखल घेत राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी सिटीस्कॅन मशीनला मंजुरी दिली़ महिनाभरापूर्वी ही मशीन बसविण्यात आली आहे़ शनिवारी जन आशीर्वाद यात्रेनिमित्त युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे हे परभणी शहरात येणार होते़ त्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून नियोजन करून या मशीनचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले़ त्यानुसार ३ आॅगस्ट रोजी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिटीस्कॅन मशीनचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, अर्जुन खोतकर, माजी खा़ चंद्रकांत खैरे, खा़ संजय जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ प्रकाश डाके, डॉ़ रिझवान काजी, डॉ़ कालिदास चौधरी, डॉ़ पवार आदींची उपस्थिती होती़रुग्णांची गैरसोय होणार दूर४मागील दोन वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन अभावी डॉक्टरांना आजाराचे निदान करणे अवघड जात होते़४त्याचबरोबर रुग्णांनाही बाहेरून सिटी स्कॅन करण्यासाठी मोठा आर्थिक झळ सहन करावी लागत होती़ त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती़ परंतु, आता या सिटी स्कॅन मशीन रुग्णालयात उपलब्ध झाल्याने रुग्णांची गैरसोय दूर होणार असल्याचे दिसून येत आहे़
परभणी : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रुग्णांना मिळाली सीटीस्कॅन मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:29 AM