लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन रेल्वे प्रवाशांना शुद्ध आणि थंड पाणी वाटपाचा शांतीदूत सेवाभावी संस्थेचा उपक्रम दरवर्षी हजारो प्रवाशांची तृष्णा भागवितो. त्यांचा हा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले.परभणी रेल्वे स्थानकावर शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरु केलेल्या थंड आणि शुद्ध पाणी वाटप उपक्रमाचे उद्घाटन खा.बंडू जाधव यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शांतीदूतचे संस्थापक सुभाषचंद्र सारडा तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.दिनेश भुतडा, प्रणव भंडारी, भगीरथ सोमाणी, सुभाष काबरा, सत्यनारायण चांडक, श्रीराम तापडिया, राजेश येरावार, कांतीलाल झांबड, सुरेंद्र सोमाणी, हनुमानदास बजाज, सत्यनारायण मंत्री, केशव सारडा, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, पुरुषोत्तम धूत, नंदलाल सोनी, केदारनाथ सारडा, दीपक भंडारी, दुर्गादास बंग, स्टेशन प्रबंधक देविदास भिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात सुभाषचंद्र सारडा म्हणाले, शांतीदूत संस्था दरवर्षी प्रवाशांची तहान भागविण्यासाठी जलयज्ञ करीत आहे. प्रवाशांमध्येच ईश्वरांचा अंश असल्याने तहानलेल्या जिवांसाठी हा यज्ञ सुरु केला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास शांतीदूतचे पदाधिकारी, रेल्वे कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परभणी : ‘शांतीदूत’चा आदर्श इतरांनी घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:03 AM