लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कमी पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीमध्ये प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी जनता व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करावे, शासन टंचाईस्थितीमध्ये जनतेसोबत आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत केले.जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत टंचाईच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, जि.प. सीईओं बी.पी. पृथ्वीराज, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना लोणीकर म्हणाले की, राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. सद्यस्थितीमध्ये पाणी, चारा यासाठी प्राधान्य दिले जात आहे. मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. केंद्र शासनाने उपग्रहाद्वारे देखील परिस्थितीची पाहणी केली आहे. विविध यंत्रणांकडून याबाबत माहिती घेतली जात आहे. याचा दुष्काळी उपाययोजना व मदतीसाठी उपयोग होणार आहे. प्रशासनातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, कृषी, गटविकास अधिकाºयांनी वस्तुस्थिती जिल्हाधिकाºयांकडे सादर करावी, असेही ते म्हणाले. सिंचनासाठी आलेला निधी वेळेवर खर्च करावा, असेही ते म्हणाले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पिनाटे यांनी जिल्ह्यातील पाऊस, दुष्काळाची झळ बसलेल्या तालुक्यांची माहिती सादर केली. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, मग्रारोहयो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.पीक परिस्थितीची विविध ठिकाणी पाहणी४लोणीकर यांनी शुक्रवारी जिंतूर तालुक्यातील गणेशपूर तसेच सेलू तालुक्यातील तळतुंबा व परभणी तालुक्यातील गावांना भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकºयांनी त्यांना खरीप हंगाम हातचा गेला, आता रब्बीसाठीही पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली.
परभणी : टंचाई स्थितीत शासन जनतेसोबत-लोणीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:50 AM