लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज आणि कृषी सल्ला मिळावा, यासाठी येणाºया वर्षांत राज्यामध्ये महावेध ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी सचिव एकनाथराव डवले यांनी दिली़वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शनिवारी आयोजित खरीप शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी डवले बोलत होते़ अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ़अशोक ढवण, विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी संचालक उमाकांत दांगट उपस्थित होते़ व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ़ दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव रणजीत पाटील, विद्यापीठ नियंत्रक महेश कुलकर्णी, लातूरचे कृषी अधिकारी एस़बी़ आळसे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती़डवले म्हणाले, शेतीसमोर अनेक समस्या आहेत़ त्या सोडविण्यासाठी संघटित होणे गरजेचे असून, गटशेतीशिवाय पर्याय नाही़ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी लागेल़ परभणी कृषी विद्यापीठातून ज्वार, सोयाबीन हे वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले ही चांगली बाब आहे, असे त्यांनी सांगितले़उमाकांत दांगट म्हणाले, बदलत्या हवामानात ज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे शेती करावी लागेल़ कुलगुुरु डॉ़ अशोक ढवण यांनी अध्यक्षीय समारोप केला़ डॉ़ प्रदीप इंगोले यांनी प्रास्ताविक केले़ डॉ़ विना भालेराव, डॉ़ अरुण गुट्टे यांनी सूत्रसंचालन केले़ मुख्य विस्तार शिक्षणाधिकारी डॉ़ प्रशांत देशमुख यांनी आभार मानले़पुरस्कार प्राप्त शेतकºयांचा सत्कारया खरीप शेतकरी मेळाव्यात पुरस्कार प्राप्त शेतकºयांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ त्यामध्ये जालना जिल्ह्यातील उद्धवराव खेडेकर, जयकिशन शिंदे, पुंजाराम भुतेकर, औरंगाबाद जिल्ह्यातील भरत आहेर, विजय चौधरी, संतोष देशमुख, उस्मानाबाद जिल्ह्यातील त्र्यंबक फंड, विकास थिटे, बीड जिल्ह्यातील बालाजी तट, रमेश सिरसाठ, संतोष राठोड, लातूर जिल्ह्यातील बाबासाहेब पाटील, अनिल चेळेकर, परभणी जिल्ह्यातील सदाशिव थोरात यांचा समावेश आहे़
परभणी :अचूक हवामान अंदाज देण्याची योजना लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:26 AM