शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

परभणी : ‘नियोजन’चे बस्तान ‘मानव विकास’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 1:13 AM

जिल्हा नियोजन विभागात फर्निचर तयार काम सुरू असल्याने या विभागाच्या समोरच असलेल्या मानव विकास मिशन कार्यालयात नियोजन विभागाचे बस्तान मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या विभागातील जुनी कागदपत्रे समोरच्याच पॅसेजमध्ये ठेवण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा नियोजन विभागात फर्निचर तयार काम सुरू असल्याने या विभागाच्या समोरच असलेल्या मानव विकास मिशन कार्यालयात नियोजन विभागाचे बस्तान मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या विभागातील जुनी कागदपत्रे समोरच्याच पॅसेजमध्ये ठेवण्यात आली आहेत. नियोजन विभागात नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने इतर विभागातील अधिकारी, पदाधिकाऱ्यांची मात्र चांगलीच गैरसोय होत आहे.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागाच्या बळकटीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. येत्या एक-दोन महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने उपलब्ध झालेल्या निधीतून कामे उरकून घेण्याची घाई सुरू झाली आहे. या घाईतच नियोजन विभागाचे नूतनीकरणाचे काम सुरू केल्याने पदाधिकाºयांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे. पदाधिकारी कामे घेऊन आल्यास त्यांच्या फाईली लवकर सापडत नाहीत.या कार्यालयातील सर्वच दफ्तर इतरत्र हलविण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्वच पदाधिकाºयांची कामे मंजूर करुन घेण्यासाठी गडबड सुरू झाली आहे, त्यातच नियोजन विभागाच्या नूतनीकरणाचे काम सुरू केल्याने त्यात अडथळे येत आहे.जुनी कागदपत्रे उघड्यावरचजिल्हा नियोजन विभागाच्या कक्षामध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने या कक्षातील कागदपत्रेही कक्षाबाहेर काढण्यात आली आहेत़ नियमित वापराची कागदपत्रे मानव विकास विभागाच्या कार्यालयात ठेवली असली तरी मोठ्या प्रमाणात जुन्या फाईली, कागदपत्रांचे गठ्ठे दोन्ही विभागाच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत ठेवण्यात आली आहेत़ ही कागदपत्रे उघड्यावरच ठेवल्याने कागदपत्रांच्या सुरक्षेसंदर्भातही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़ नियोजन विभागासाठी याच भागात असलेला एक हॉल तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आला असून, या हॉलमध्ये सर्व कागदपत्रे आणि फाईली हलविण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे़दैनंदिन कामावर परिणाम नाही४नियोजन विभागात वर्ग २ चे तीन अधिकारी आहेत; परंतु या अधिकाºयांसाठी दोनच कक्ष उपलब्ध आहेत. तसेच इतर कर्मचाºयांसाठीही जागा पुरत नव्हती. त्यामुळे नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम सुरू असून एक ते दीड महिन्यात ते पूर्ण होईल. याच भागात असलेल्या डाटा एन्ट्रीचा हॉल नियोजन विभागासाठी दिला आहे. एक- दोन दिवसांत या हॉलमध्ये स्थलांतर करण्याचे काम पूर्ण होईल. नियमित लागणाºया फाईल आणि इतर कागदपत्रे मानव विकास मिशन कार्यालयात ठेवले असून, बाहेरच्या पॅसेजमध्ये जुने रेकॉर्ड आहे. नूतनीकरणामुळे दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही. यंत्रणांकडून जेवढ्या गतीने कामे येतील, त्याच गतीने त्यांची कामे आम्ही करुत, असे जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणी