परभणी : हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना पोलिसांनी घेतले ताब्यातलोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी ) : कुठल्याही वर्गात प्रवेश नसतानाही महाविद्यालयात विनाकारण उभे राहून हुल्लडबाजी करणाºया ११ युवकांना चिडीमार पथकाने ताब्यात घेतल्याची घटना शहरातील नूतन महाविद्यालयात बुधवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे हुल्लडबाजांना चांगलीच चपराक बसली आहे.काही दिवसांपूर्वीच विद्यार्थिनींचा पाठलाग कन छेड काढणाºया दोन रोडरोमियोंना बसस्थानक परिसरात विद्यार्थिनींनी चप्पलाचा मार दिला होता. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर रोडरोमियोंना अद्दल घडविण्यासाठी सेलू पोलिसांनी चिडीमार पथक स्थापन केले. बसस्थानक, शाळा व महाविद्यालय परिसरात गस्त घालण्याचे आदेश दिले. बुधवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास नूतन महाविद्यालयात चिडीमार पथक दाखल झाले. महाविद्यालयात प्रवेश नसतानाही विनाकारण प्रवेशद्वाराजवळ उभे राहून हुल्लडबाजी करणाºया ११ युवकांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. यावेळी ओळखपत्र नसणाºया युवकांना पोलिसांनी चांगलेच फैलावर घेतले होते. महाविद्यालयात प्रवेश करुन हुल्लडबाजी करणाºया युवकांची संख्या वाढत होती; परंतु चिडीमार पथकाने बुधवारी अचानक महाविद्यालयात येऊन हुल्लडबाजांना चांगलाच धडा शिकविला. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक नितीन काशीकर, पोलीस कर्मचारी रामेश्वर मुंडे, सारिका कड, रणजित आगळे, संजय साळवे यांचा समावेश होता.
परभणी : हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 11:51 PM