लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गणेशोत्सव काळात अवैध धंद्यांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन पोलिसांनी या अवैध धंद्यांविरूद्ध मोहीम उघडली असून, ३ सप्टेंबर रोजी रात्री मानवत येथे जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करीत स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने २८ आरोपींना ताब्यात घेतले आहे़ तसेच स्थानिक पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकांनीही या धंद्यांविरूद्ध कारवाई केल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़दीड लाखांचा मुद्देमाल जप्तमानवत शहारातील खंडोबा रस्त्यावर एका रेस्टॉरंटमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून एका नगरसेवकासह २८ जणांवर कारवाई करीत १ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ३ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली.शहरातील खंडोबा रस्त्यावर असलेल्या अमोल रेस्टॉरंटमध्ये पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रेस्टॉरंटवर रात्री १०.३० वाजता धाड टाकली असता झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी २८ जणांवर कारवाई करुन ८० हजारांच्या रोख रकमेसह मोबाईल, जुगाराच्या साहित्यासह एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी देवकते यांच्या फिर्यादीवरून नगरसेवक विनोद राहाटे, जनार्दन कीर्तने, दीपक भदर्गे, कैलास शिंदे, दत्ता रोडे, सुनील पाटेकर, सुधाकर बारहाते, ओमप्रकाश चव्हाण, नवनाथ गुदटवार, शाम कुºहाडे, सुंदर लेंगुळे, चक्रपाणी भक्ते, नितीन चव्हाण, शेख बाबू शेख बिसमिल्ला, अशोक धबडगे, योगेश गायकवाड, भास्कर काळे, अण्णासाहेब बारहाते, युवराज लाड, शेख शमीम शेख मेहबूब, शेख मेहमूद शेख मेहबूब, आकाश चव्हाण, बालाजी आळसे, राजू बारहाते, शेख नफिक शेख शफिक, कैलास धबडगे, मनोज चव्हाण, नारायण भोरपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मुंडे करीत आहेत. त्याच प्रमाणे सिंगणापूर-तरोडा या रस्त्यावरील एका शेतात लिंबाच्या झाडाखाली जुगार सुरू असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कारवाई केली़ त्यात लिंबाजी सखाराम गायकवाड, शंकर दत्तराव कदम, राजेभाऊ शेषराव रत्नपारखे यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा १० हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला़ या प्रकरणात आरोपीविरूद्ध दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ मंगळवारी रात्री पोलिसांनी पाथरी, सेलू, गंगाखेड, सोनपेठ आणि परभणी शहरात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकले़ चोरून दारू विक्री करणाºया ११ आरोपीविरूद्ध कारवाई केली आहे़ त्यात ३२ हजार ९६२ रुपयांची दारू जप्त करण्यात आली़पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; ८ लाखांचा ऐवज जप्तपरभणी- शहरातील बेलेश्वर महादेव मंदिर परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ८ लाख ४४ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ त्यात रोख १३ हजार रुपये आणि ९ मोबाईल, १२ मोटारसायकलचा समावेश आहे़ या प्रकरणात पोलिसांनी एकूण २१ आरोपींविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जुगार अड्डे व अवैध दारू विक्रीच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे़या मोहीमेंतर्गत ३ सप्टेंबर रोजी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली़ बेलेश्वर महादेव मंदिरापासून १ किमी अंतरावरील नितेश प्रकाश देशमुख यांच्या आखाड्यावर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच विशेष पथकातील कर्मचारी या ठिकाणी पोहचले़ तेव्हा मोठ्या संख्येने एकत्र येऊन जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आले़ पथकाने तातडीने कारवाई करून रोख १३ हजार रुपये, ९१ हजार रुपयांचे मोबाईल आणि ७ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या मोटारसायकल असा ८ लाख ४४ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़या प्रकरणात नितेश प्रकाश देशमुख, देवा चव्हाण, राजू उर्फ कन्हैय्या पवार, महेश संभाजीराव साखरे, विजय गंगाराम खुने, संतोष भारतराव झाडे, सचिन पवार, मंगेश दीपके, गौतम उर्फ बाबा वायवळ, अनिल नागोराव झाटे, राहुल पंढरीनाथ घोडके, शैलेश रमेश चव्हाण, नारायण खाडे, सुरेश शेळके, महेश रुस्तूमराव खल्लाळ, वैभव विश्वनाथ झोडपे, मो़ इक्रामोद्दीन मो़ असिफोद्दीन, गजानन बाळासाहेब चव्हाण, गौरव देशमुख, हनुमान रायमले आदींवर कारवाई केली़ या छाप्या दरम्यान ७ जण मोटारसायकल घेऊन पळून जाण्यास यशस्वी ठरले़
परभणी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरूद्ध पोलिसांचे धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 12:41 AM