शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

परभणी : जुगार, अवैध दारूविक्रीविरूद्ध जिल्हाभरात पोलिसांचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 11:27 PM

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जुगार, अवैध दारू विक्री वाढत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी याविरूद्ध मोहीम आखली असून, मंगळवारी जिल्हाभरात ठिक ठिकाणी धाडसत्र करण्यात आले़ त्यात जुगार खेळणाऱ्या १६ आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात आली तर दारुची विक्री करणाºया १८ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जुगार, अवैध दारू विक्री वाढत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी याविरूद्ध मोहीम आखली असून, मंगळवारी जिल्हाभरात ठिक ठिकाणी धाडसत्र करण्यात आले़ त्यात जुगार खेळणाऱ्या १६ आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात आली तर दारुची विक्री करणाºया १८ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे़२ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे़ या काळात जुगार, दारु विक्रीत वाढ होऊन गुन्हेगारी घटना घडण्याची शक्यता असते़ या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी ठिक ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे़ मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतामध्ये मनोज उत्तमराव चव्हाण, सुंदर सुदामराव लेंगुळे, लक्ष्मण भीमराव काळे, विकास भाऊराव दहीहंडे, जावेद मन्ना मणियार, मुंजा राजू पांढरे, निशांत श्यामराव धबडगे हे आरोपी तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना पोलसांनी या कारवाईत ५ हजार ५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले़ सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिलिंद भिकाजी भोकरे, गौतम तुकाराम आगळे, श्रीकांत पांडूरंग किरवले, पांडुरंग बालासाहेब कांबळे हे चौघे तिर्रट खेळताना पोलिसांना आढळून आले़ नगरपालिकेच्या गोदामाशेजारी हा जुगार सुरू होता़ त्यावेळी पोलिसांनी छापा टाकला़ कारवाईत १ हजार ५० रुपये जप्त करण्यात आले़ गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुभाष भीमा इंगळे, मारोती धोंडीबा पवार, दिलीप नामदेव रखांबे, प्रभाकर तुकाराम घोगरे, बालासाहेब बापूराव वाळके या पाच जणांवर छापा टाकण्यात आला़ गंगाखेड शहरातील तुळजा भवानी नगर येथील मारोती पवार याच्या घरी जुगार खेळला जात होता़ पोलिसांनी ६३० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. २ रोजी जिल्हाभरात १६ आरोपींविरूद्ध कारवाई करीत ६७३० रुपये जप्त करण्यात आले़पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरूद्धही सोमवारी ठिक ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे़ या कारवाईत बाळू रेवा जाधव, बबन आश्रोबा गायकवाड (रा़लोणी), बापूराव माणिकराव गायकवाड (रा़ पोरजवळा), माणिक नानासाहेब तुरे (भोगाव देवी), वैजनाथ किशनराव आव्हाड (वस्सा), उद्धव खोबराजी चमकुरे, अमीर खान हबीब खान पठाण (परभणी) अभिमन्यू रंगनाथ गायकवाड (टाकळी), बालाजी रंगनाथ पवार (साळापुरी), शिवाजी लक्ष्मण घुगे (इटोली), अंकुश काळे (सेलू), नारायण रामराव घुगे (सावळी), किरण श्रीरंग डंबाळे (परभणी), शैलेश अण्णा (परभणी) यांच्यासह ४ महिला आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात आली़ या छाप्यांमध्ये देशी, विदेशी दारुच्या २८४ बाटल्या आणि ४० लिटर गावठी हातभट्टी दारू पोलिसांनी जप्त केली आहे़हातभट्टी दारू पकडली४परभणी- सोनपेठ तालुक्यातील शेळगाव परिसरात चोरून विकली जाणारी हातभट्टी दारू पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी जप्त केली आहे़४सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या हातभट्टी दारूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्याआधारे सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील अशोक रामभाऊ घोंगडे यांच्या घरी पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी छापा मारला़ त्यावेळी दारूच्या दोन कॅन जप्त करण्यात आल्या़ २ हजार ७५० रुपयांची ५० लिटर दारू पोलिसांनी या कारवाईत जप्त केली आहे़ या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी