लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी जिल्ह्यातील ४१० केंद्रांवर ० ते ५ वर्षे या वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले. यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पथकेही स्थापन करण्यात आली आहेत.पोलिओ निर्मूलन मोहिमेअंतर्गत १० मार्च रोजी जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात आले. परभणी येथे जिल्हाधिकारी पी. शिव शंकर व महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांच्या हस्ते या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी महापालिकेचे आरोग्य सभापती सचिन देशमुख, आरोग्य अधिकारी आरती देऊळकर, डॉ.कल्पना सावंत, अमोल सोळंके, गजानन जाधव, रितेश जैन, डॉ.कलीम बेग, डॉ. पवार, डॉ. सावरगावकर, डॉ. समीर नवल, सोमवंशी आदींची उपस्थिती होती.शहरातील स्टेशनरोड, बसस्थानक, दर्गा परिसर, अंगणवाडी शाळा, शहर परिसरातील वीटभट्टी आणि महापालिकेच्या सहा आरोग्य केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील प्रत्येक वसाहतीमध्ये पोलिओ लसीकरण करण्यात आले.महापालिकेतील परिचारिका, सुपरवायझर, आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जात आहे. शहरात २१० बुथवर बालकांना लसीकरण करण्यात आले. यासाठी ५० पथकांची नियुक्ती करण्यात आली असून १२ ते १६ मार्च या काळात लसीकरणासाठी ११० पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना घरी जाऊनही लस दिली जाणार असल्याची माहिती सभापती सचिन देशमुख यांनी दिली.जिल्हाभरात मोहीम४जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत जिल्हाभरात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ग्रामीण भागातील १ लाख १८ हजार १४१ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत दिवसभरातील लसीकरणाचा आकडा स्पष्ट झाला नव्हता.
परभणी : ४१० केंद्रांवर पोलिओ लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:31 PM