शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

परभणी: इंद्रायणी माळ बनला पक्ष्यांचा अधिवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:29 PM

वाढते औद्योगिकीकरण, शहरी भागातील वाढत चाललेले प्रदूषण, मोबाईलचे टॉवर आणि सिमेंटीकरणाची झालेली स्पर्धा या सर्वांचा परिणाम पक्ष्यांवर होत असल्याचे मागील काही वर्षांपासून समोर येत आहे़ शहरी भागात पक्षी दूर गेले आहेत़ अशा परिस्थितीत परभणी शहरापासून साधारणत: २२ किमी अंतरावर असलेल्या इंद्रायणी माळावर मात्र विविध पक्ष्यांनी आपला अधिवास शोधला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाढते औद्योगिकीकरण, शहरी भागातील वाढत चाललेले प्रदूषण, मोबाईलचे टॉवर आणि सिमेंटीकरणाची झालेली स्पर्धा या सर्वांचा परिणाम पक्ष्यांवर होत असल्याचे मागील काही वर्षांपासून समोर येत आहे़ शहरी भागात पक्षी दूर गेले आहेत़ अशा परिस्थितीत परभणी शहरापासून साधारणत: २२ किमी अंतरावर असलेल्या इंद्रायणी माळावर मात्र विविध पक्ष्यांनी आपला अधिवास शोधला आहे़निसर्गाचा समतोल रोखण्यासाठी ज्या प्रमाणे झाडे आवश्यक आहेत, त्याच प्रमाणे पक्ष्यांचा सहवासही तेवढाच महत्त्वपूर्ण ठरतो़ एका झाडाचे बी दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे आणि त्या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी खारीचा वाटा उचलणारे पक्षी शहरातून लुप्त होत चालले आहेत़शहरापासून काही अंतरावर असलेल्या इंद्रायणी माळावर दाट वनराई वाढत आहे़ मुक्त आणि स्वच्छंद वावरण्यासाठी या माळावरील वातावरण पक्ष्यांना योग्य ठरत असून, मागील काही महिन्यांपासून या माळावर विविध जातीचे पक्षी पहायला मिळत आहे़ या पक्ष्यांचा चिवचिवाट, किलबिलाट पक्षी अभ्यासकांना साद घालत आहे़येथील पक्षी अभ्यासक माणिक पुरी यांनी इंद्रायणी माळ आणि परिसरातील पक्ष्यांचा अभ्यास केला, तेव्हा वेगवेगळ्या जातीचे अनेक पक्षी या ठिकाणी वास्तव्याला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ माणिक पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार या माळावर खाटिक पक्षी, सुगरण, कांडीमार, पळस मैना, रानबदक, तितर, लाव्हरी, काळा शटारी आदी पक्षी वास्तव्याला आल्याची नोंद त्यांनी घेतली आहे़ पुरी यांनी सांगितले, इंद्रायणी माळावर खाटिक पक्षी मोठ्या संख्येने पहायला मिळतो़ राखाडी आणि रंगीत खाटिक पक्षी अभ्यासकांचे लक्ष वेधतात़ अभ्यासकांना सुगरण पहायची असते; परंतु, पुढे येतो तो खाटिक पक्षी़लहान झाडांच्या शेंड्यावर बसून तो टेहाळणी करतो़ खाऊन उरलेलं अन्न झाडावर लटकवून ठेवतो़ हा पक्षी संशोधकांसाठी मोठी संधी उपलब्ध करून देत आहे़ मांडाखळी, बाभूळगाव, डफवाडी, उमरी, भोसा, डोहरा, जंगमवाडी, पिंपळा या गावांच्या मधोमध असलेला इंद्रायणी देवीचा माळ अनेकांना खुणावतो़ नवरात्रीत या ठिकाणी देवीची यात्रा भरते़ बैलगाडीने या माळावरील झाडांची विविधता पाहता येते़ हवे तिथे बसून पक्ष्यांचे निरीक्षण करता येते़ याच वाटेवर सुगरण पक्ष्याच्या विणीच्या हंगामात एका दगडावर बसून या पक्ष्याचे निरीक्षण करता येते़ सुगरणीचे दोन मजली घरटे या ठिकाणी पहावयास मिळतात़सुगरण पक्ष्याला चिगा असेही म्हटले जाते़ इंद्रायणी माळ सर्वच पशूपक्ष्यांना पंखाखाली घेऊन वाढवितो़ पाखरंही निर्धास्तपणे आपली घरटी, पिलं येथे वाढवतात, असे अभ्यासक पुरी यांनी सांगितले़माळरानावर शटारी पक्षाची विणही अनुभवलीतितिर, लाव्हरी या पक्ष्यांचाही माळावर ऊत आला आहे़ रस्त्याने चालताना या पक्ष्यांची हालचाल नजरेतून सुटत नाही़ एखाद्या झुडपात दगड भिरकावला तरी दोन-तीन तितीर फडफडत बाहेर पडतात़ काळ्या शटारी पक्ष्याची विणही याच माळावर दिसते़ वडाच्या झाडावर त्यांची घरटी उठून दिसतात़कांडीमार पक्षीही४पावसाळी दिवसांत कांडीमार पक्ष्याच्या मादीला पाच-सहा नर स्वत:कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात़ हे नर स्वत:च्या गळ्याखाली असलेला फुगा फुगवित होते़ तो जमिनीपर्यंत लोंबत होता़ पुन्हा अंकुचन पावायचा़ पण मादी थोड्या अंतरावर जाऊन सर्व पाहत होती़४काही वेळाने एक नर आणि मादी एका बांधावर उभे होते तर बाकीचे नर त्या झाडाखाली थांबले होते़ हा अनुभवही याच माळावर अनुभवल्याचे माणिक पुरी यांनी सांगितले़४पळस फुलल्यावर हजारोंच्या संख्येने पळस मैना फुलातील मकरंद चाखायला इंद्रायणी माळावर उतरतात़ पक्षी रेखाटकांना या पळस मैनांचे रेखाटणे काढण्यासाठी ही जागा अतिशय योग्य आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीforestजंगल