शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

परभणी :बेसुमार वाळू उपश्याने दुधना नदीपात्रात खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:11 AM

वाळूमाफियांनी बेसुमार वाळू उपसा केल्याने दुधना नदीपात्राच्या काजळी रोहिणा शिवारात मोठमोठे खड्डे पडले असून, दुधना प्रकल्पातून पाणी सोडल्याने हे खड्डे पाण्याने भरले आहेत. दुधना नदीपात्रात सर्वत्र पाण्याचे डोह निर्माण झाले आहेत.

परभणी :बेसुमार वाळू उपश्याने दुधना नदीपात्रात खड्डेलोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : वाळूमाफियांनी बेसुमार वाळू उपसा केल्याने दुधना नदीपात्राच्या काजळी रोहिणा शिवारात मोठमोठे खड्डे पडले असून, दुधना प्रकल्पातून पाणी सोडल्याने हे खड्डे पाण्याने भरले आहेत. दुधना नदीपात्रात सर्वत्र पाण्याचे डोह निर्माण झाले आहेत.दुधना नदीच्या काजळी रोहिणा ेयेथील वाळू धक्क्याचा लिलाव झाला होता. त्यानंतर संबंधित निविदाधारकाने हजारो ब्रास वाळूचे उत्खनन केले. परिणामी नदीपात्रात सर्वत्र खड्डे पडले. दुधना नदीकाठावरील गावांसाठी व परभणी, पूर्णा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी १ जून रोजी निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.वाळूमुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात पाणी साचले आहे. काजळी रोहिणा शिवारातील शेतकऱ्यांना नदीपात्र ओलांडून शेतीची मशागत करण्यासाठी जावे लागते. सध्या खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी मशागतीत व्यस्त आहेत. नदीपात्रातील खड्ड्यात पाणी साचल्याने नदी ओलांडून शेतीसाठी लागणारे साहित्य, औजारे, खत व जनावरे घेऊन जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.रोहिणा येथील वाळू धक्क्याच्या लिलावापूर्वी वाळूमाफियांनी अवैध वाळू उपसा केला होता. त्यानंतर वाळू धक्क्याचा रितसर लिलाव झाला; परंतु, संबंधित निविदाधारकाने प्रमाणापेक्षा अधिक वाळू उपसा केल्याने नदीपात्रात १० ते १५ फुटापर्यंत खड्डे पडल्याचा आरोप रोहिणा येथील शेतकऱ्यांनी केला आहे. या खड्ड्यांमुळे मागील आठवड्यात बैलाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे नदीपात्रातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. दरम्यान, पावसाळ्यात नदीपात्राच्या खड्ड्यात आणखी पाणी साचणार आहे. त्यामुळे नदी ओलांडून शेताकडे जाणे अवघड होणार आहे. वाळूच्या वाहतुकीमुळे नदीपात्राशेजारील गावच्या रस्त्यांची दुरवस्था होत आहे. तसेच पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.नदीपात्र बनले धोकादायक४राजा, काजळी रोहिणा, गोगलगाव आदी गावच्या शिवारातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा झाला.४रोहिणा येथे क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसली असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे टेंडरधारक मालमाल झाले असल्याचे दिसत आहे.४वाळूचे भावही गगणाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम करणे कठीण झाले आहे. यामुळे वाळू चोरांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.ग्रामस्थांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन वाळू अवैध उपसा सुरूचच्काजळी रोहिणा शिवारातील दुधना नदीपात्रात वाळूचा बेसुमार उपसा झाल्याने दुधना पात्र खड्डेमय झाले आहे. सद्यस्थितीत या खड्ड्यात पाणी असल्याने शेतकºयांना पात्र ओलांडून शेती औजारे नेणे अवघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने स्थळ पाहणी पंचनामा करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. शेतकºयांना रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहे.च्नदीपात्रातील खड्ड्यात पाणी साचले असतानाही रोहिणा शिवारातून वाळूचा अवैध उपसा केला जात आहे. अधिकाºयांची नजर चुकवून रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक केली जात आहे. दुधना नदीपात्र खड्डेमय झाल्याने प्रकल्पातून सोडलेले पाणी टेलपर्यंत पोहचण्यासाठी कसरत करावी लागत आहे. वाळूच्या अवैध उपशाला प्रशासनाने प्रतिबंध घालावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूriverनदी