लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाचा खंड पडला आहे. परतीच्या पावसाची आशा मावळली असून वेळेत पाऊस न पडल्याने सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पालम तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात २८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यावर्षी प्रारंभी पिकाची वाढ जोमदार झाली होती. शेतकऱ्यांनी हजोरांचा खर्च करीत खताचा डोस देत औषधांची फवारणी केली होती. ऐेन शेंगा भरणीच्या वेळी पावसाने तालुक्यात उघडीप दिली. एका महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले तरी पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे सोयाबीनचा दाना अतिशय लहान आकारात राहिला आहे. तसेच मालाचा दर्जा खराब होत आहे. पीक वाळून गेल्याने कापणी व काढणीची कामे सुरू आहेत. उत्पादनात निम्यापेक्षा जास्त घट झाली असून खर्च निघणेही कठीण बनले आहे. त्यामुळे शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले आहेत.एकरी : कापसणीसाठी ३ हजारांची मजुरीयावर्षी पाऊस वेळेवर न झाल्याने सोयाबीन पिकाची कापणी एकाच वेळी सर्वत्र आली आहे. त्यामुळे मजुरांची अडचण भासत आहे. एकरी कापणीसाठी २ हजार ५०० ते ३००० रुपयांचा खर्च लागत असून शेतकºयांना तो परवडनासा झाला आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर दरवर्षी सोयाबीन पीक येत असते. हे पीक शेतकºयांचे नगदी पीक असल्याने अनेक व्यवहार या पिकावर अवलंबून आहेत;परंतु, पावसाने दगा दिल्याने शेतकºयांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत.वस्सा परिसरात परतीच्या पावसाची हुलकावणीवस्सा- जिंतूर तालुक्यातील वस्सा परिसरात ३० दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. त्यातच परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात वस्सा परिसरात सोयाबीन व कापसाची मोठ्या संख्येने लागवड झाली आहे;परंतु, ऐन पावसाळ्यात महिन्यापासून पावसाने खंड दिला आहे. त्यातच परतीच्या पावसाने चकवा दिल्याने खरीप हंगामाची वाट लागली आहे. सोयाबीन व कापसाचा उतार निम्याने घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरडवाहू शेतकºयांसाठी परिस्थिती चिंताजनक असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर वस्सा व परिसरात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परभणी : सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:29 AM