लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमांनुसार निवडूण आल्यानंतर सहा महिन्यांमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांना पदावरुन अनर्ह करण्याचा निर्णय बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला असून या निर्णयानुसार परभणी जिल्ह्यातील १० नगरसेवकांची पदे धोक्यात आली आहेत.परभणी जिल्ह्यात नोव्हेंबर २०१६ मध्ये नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत राखीव जागेवरुन निवडणूक लढविणाºया उमेदवारांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची पावती दाखल करुन निवडणूक लढविली. मात्र या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केले नसल्याची बाब समोर आली आहे. येथील नगरपालिका प्रशासन विभागातून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ९ नगरसेवकांनी आतापर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केले नाही. हे प्रमाणपत्र दाखल करण्याची मुदत संपून काही महिन्यांचा कालावधी लोटला. तरीही हे प्रमाणपत्र दाखल करण्यात आले नाही. उपलब्ध माहितीनुसार सेलू नगरपालिकेतील कादरी नाहीद तब्बसूम अजीम, विक्रांती सदाशीव जाधव, सोनपेठ पालिकेतील सुवर्णा सुनील बर्वे, पाथरी पालिकेतील आम्रपाली सतीश वाकडे, बेलदार शमा परवीन, मंगल राजेश पाटील आणि गंगाखेड नगरपालिकेतील अजीज खान इब्राहीम खान व विमलताई रमेश घोबाळे या नगरसेवकांचे जात वैधता प्रमाणपत्र अद्यापपर्यंत दाखल झाले नाही.परभणीत एका सदस्याचे प्रमाणपत्र बाकी; एकाचे सदस्यत्व अनर्ह४परभणी महानगरपालिकेमध्ये ६५ नगरसेवक असून त्यापैकी २७ नगरसेवक राखीव जागेवरुन विजयी झाले आहेत. राखीव जागेवरुन निवडून आलेल्या सदस्यांपैकी प्रभाग क्रमांक ७ अ मधील सदस्य जाहेदा बेगम इब्राहीम यांचे वैधता प्रमाणपत्र महापालिकेला प्राप्त झाले नाही; परंतु, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संशोधन अधिकाºयांनी महापालिकेला पत्र पाठवून जाहेदा बेगम इब्राहीम यांचे प्रमाणपत्र या कार्यालयात प्रलंबित असल्याचे कळविले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतरही जाहेदा बेगम इब्राहीम बेगम यांना दिलासा मिळाला आहे. तर काही दिवसांपूर्वीच प्रभाग क्रमांक ११ अ मधील काँग्रेसचे सदस्य मो. नईम मो. यासीन यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे सदस्यत्व अनर्ह ठरविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.राखीव जागांवर ६० सदस्य४परभणी जिल्ह्यात ७ नगरपालिकांमध्ये झालेल्या निवडणुकीत ६० सदस्य राखीव जागेवरुन विजयी झाले आहेत. त्यापैकी ९ सदस्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले नाही. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदही थेट जनतेतून निवडण्यात आले. ७ नगराध्यक्षांपैकी ३ नगराध्यक्ष राखीव जागेवरुन विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी मानवत पालिकेच्या नगराध्यक्षा शिवकन्या स्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना पदावरुन दूर व्हावे लागले आहे.न्यायालयाचा निर्णय झाल्याने जात वैधता प्रमाणपत्रांसंदर्भात सर्व नगरपालिकांमधून माहिती घेतली जात आहे. ही माहिती एकत्रित झाल्यानंतर पुढील निर्णयासंदर्भात कारवाई केली जाईल. सध्या माहिती एकत्र करण्याचे काम सुरु आहे.-उमेश ढाकणे, प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी
परभणी : जिल्ह्यातील दहा नगरसेवकांचे पद धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:26 AM